Priyanka Chopra Viral Video : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा ही तिच्या फक्त सुंदरतेसाठी नाही तर तिच्या निर्मळ स्वभावासाठी देखील ओळखली जाते. प्रियांका सध्या तिचा पती निक जोनसच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. प्रियांका चोप्राला पाहण्यासाठी गर्दी ते निक जोनसच्या कॉन्सर्टमधील अनेक गोष्टी. सध्या प्रियाकांचा तिच्या पतीच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाचा हा व्हिडीओ रियल बॉलिवूड हंगामा या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रियांका या वेळी तिच्या पतीच्या कॉन्सर्टचा आनंद घेताना दिसते. त्यासगळ्यात प्रियांका येते तिची बॅग समोर असलेल्या स्टॅन्डमध्ये ठेवते आणि त्यानंतर प्रियांका मागे वळते आणि तिथे स्टॅंडमध्ये असलेले स्नॅक्सचे पॅकेट हे तिथे काम करणाऱ्या महिलांना देताना दिसते. त्यानंतर त्या महिला तिला धन्यावाद बोलताना दिसतात. इतकंच नाही तर त्यांना प्रियांका जितक्या चांगल्या प्रकारे ट्रीट करते ते पाहून तिच्या चाहत्यांना फार आनंद झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्रियांकानं बोस्टनमध्ये जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती. जेव्हा निक स्टेजवर परफॉर्म करत होता. तेव्हा प्रियांका पती निकसाठी चिअर करताना दिसली. यावेळी प्रियांका तिच्या मैत्रिणींसह कॉन्सर्टचा आनंद घेताना दिसली. एका व्हिडीओत निक रोमॅन्टिक गाणं गाण्याआधी प्रियांकाला आय लव्ह यू बोलताना दिसतो. 


दरम्यान, प्रियांकाच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'मी तिला खूप वेळा भेटलो आहे आणि ती नेहमीच सगळ्यांशी इतक्या चांगल्या पद्धतीनं वागते. ती कधीच खोटं वागत नाही. तिचं मन खूप साफ आहे. ती जशी होती तशीच आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत. ज्यांना यश मिळाल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला आहे. तर ते खूप चांगले आहेत हे दाखवण्यासाठी ते लोकांशी गोड गोड वागतात.' 


हेही वाचा : 'कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला अन्...', हेमा मालिनी यांना मुंबईतील घरात आला होता भयानक अनुभव


प्रियांका विषयी बोलायचं झालं तर ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील तिचं एक स्थान निर्माण केलं आहे. प्रियांकानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. त्या दोघांना एक मुलगी असून मालती मेरी चोप्रा जोनस असे तिचे नावं आहे.