'कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला अन्...', हेमा मालिनी यांना मुंबईतील घरात आला होता भयानक अनुभव

Hema Malini : हेमा मालिनी यांनी त्यांना मुंबईत आलेल्या एका भयनाक अनुभवाविषयी सांगितलं आहे. त्यावेळी कोणी तरी त्यांचा गळा दाबतय असे त्यांना वाटू लागले होते. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 17, 2023, 05:38 PM IST
'कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला अन्...', हेमा मालिनी यांना मुंबईतील घरात आला होता भयानक अनुभव title=
(Photo Credit : Social Media)

Hema Malini : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचे सुपरहिट चित्रपटांची यादी ही न संपणारी आहे.  हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यात हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील काही गोष्टी त्यांनी कधीच सांगितल्या नाहीत. तर कधी कधी त्या हळू हळू सांगताना दिसतात. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी त्यांच्या आयुष्यात आलेला एक अतिशय भयानक प्रसंग सांगितला आहे. हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. हेमा मालिनी यांना सपनों का सौदागर या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. या चित्रपटासाठी त्यांना चेन्नईतून मुंबईला यावे लागले. त्यावेळी त्यांना हा किस्सा सांगितला आहे. 

हेमा मालिनी यांनी ही मुलाखत 2018 साली दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सांगितलं आहे. यावेळी हेमा मालिनी यांनी सांगितले की त्या मुंबईतील वांद्र परिसरात असलेल्या मनावेंद्र अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. काही दिवसांनंतर त्या या फ्लॅटमधून एका बंगल्यात राहण्यासाठी गेल्या. त्या बंगल्यात त्यांना खूप भयानक अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी सांगत हेमा मालिनी म्हणाले, 'सुरुवातीला त्या ज्या घरात राहत होत्या, ते खूप लहान होतं. त्यामुळे त्या जुहू परिसरात असलेल्या एका बंगल्यात शिफ्ट झाल्या. पण त्या बंगल्यात काही तरी आहे याची कल्पना त्यांना नव्हती.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांना आलेला भयानक अनुभवाविषयी सांगताना हेमा मालिनी म्हणाल्या, 'त्या बंगल्यात मला नेहमी वाटायचं की कोणी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करतय. त्यामुळे मला श्वास घेण्यास त्रास होत होता. सतत होणाऱ्या या गोष्टीचा इतका त्रास झाला की मी माझ्या आईजवळ झोपण्यास सुरुवात केली. पण तरी सुद्धा माझ्यासोबत ही घटणा सुरुच होती. रोज रात्री काही तरी होतंय हे पाहता मी कंटाळून ते घर सोडलं आणि एक फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला. काही दिवसांनी आम्हाला एक फ्लॅट मिळाला आणि आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. त्या घरातून बाहेर पडल्यानंतर मला रात्री शांत झोप येऊ लागली.'

हेही वाचा : पंकज त्रिपाठी यांना आवडतं मराठमोळं ठसकेबाज जेवण; पुढ्यात ताट येताच मारतात ताव

हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नानं सगळ्यांना धक्का बसला होता. कारण धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी पहिली पत्नी असताना लग्न केलं होतं. त्या दोघांना दोन मुली आहेत. दरम्यान, हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली. हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत.