मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने सरोगसीद्वारे जानेवारी महिन्यात मुलीला जन्म दिला, मात्र  बाळ प्रीमॅच्युअर असल्याने बाळावर हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू होते. अखेर 100 दिवसानंतर प्रियांकाची मातृदिनाच्या दिवशी घरी आहे. मुलीच्या जन्मानंतर निक आणि प्रियंकावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. फक्त सेलिब्रिटींनीच नाही, तर चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांना शुभेच्छा दिल्या. आता देखील प्रियंका एका पोस्टमुळे चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फादर्स डेच्या निमित्ताने प्रियंकाने लेकीचा फोटो वडील निक जोनससोबत पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने पतीला पहिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. फोटोमध्ये निक लेकी घेऊन चालताना दिसत आहे. 


वडील आणि लेकीचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'पहिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा. तुला आपल्या छोट्या मुलीसोबत पाहाण्याचा आनंद फार वेगळा आहे..' असं म्हणत प्रियंकाने लेक आणि पती प्रति प्रेम व्यक्त केलं. 



पण अनेकांचे लक्ष वेधलं ते म्हणजे प्रियंकाच्या लेकीच्या पायात असलेल्या  काळ्या रंगाच्या साखळीमुळे. परदेशात असूनही प्रियंकाचा 'देसी' लळा  दिसून येत आहे.


भारतीय संस्कृतीमध्ये लहान बाळाच्या पायात वाळा किंवा साखळी घालतात. प्रियंकाने देखील परदेशात भारतीय संस्कृती जपल्यामुळे अभिनेत्रीचं कौतुक होत आहे. 


दरम्यान, प्रियांकाने मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास असं ठेवल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र प्रियांकाने हे नाव का ठेवलं त्याचं कारण आता समोर आलं आहे.


आईसोबत प्रियांकाचं नातं खूप खास आहे. त्यामुळे आईच्या नावातलं 'मालती' हे नाव आणि निक ख्रिश्चन असल्याने मेरी हे नाव जोडत 'मालती मेरी' असं नाव प्रियांकाने आपल्या मुलीला दिलं आहे.