मुंबई : आषय, तंत्रज्ञाण, अभिनय अशा अनेक पातळींवर मराठी सिनेमांनी जोरदार बाजी मारली आहे. त्यामुळे बॉलिवूडचेही लक्ष आता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळले असून, बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मराठीमध्ये निर्मिती करू लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडच्या ज्या मंडळींनी मराठीकडे आपली पावले वळवली त्यांना मराठी प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीनेही भरभरून दिले. आता प्रियांका चोप्राचेच पहा ना. बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही व्हेंटिलेटरच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. व्हेंटीलेटर हा तिचा पहिलाच मराठी सिनेमा. हा सिनेमा प्रियांकाने प्रोड्यूस केला आहे. विशेष असे की, हा सिनेमा प्रियांकाला पदार्पणातच मोठे यश देऊन गेला.


प्रियांकाच्या व्हेंटिलेटरला तब्बल ५ अवार्ड जिंकून फिल्मफेयरवर आपले नाव कोरले आहे. या विशेष सक्सेसबद्धल बोलताना प्रियांका म्हणते, 'बेस्ट ओरिजनल स्टोरी, बेस्ट डेब्यु डायरेक्टर आणि बेस्ट स्क्रीनप्लेसाठी अवार्ड मिळवणाऱ्या राजेश मापुस्कर यांचे अभिनंदन. बेस्ट एडिटींगसाठी रामेस्वर भगत आणि बेस्ट साऊंड डिजायनिंगसाठी संजय मौर्य तसेच, एल्विन रेगो यांचे खूप खूप आभार. संपूर्ण टीमच्या कष्टाबद्धल मी प्रचंड आनंदी आहे.'



व्हेंटिलेटरच्या यशाबद्धल प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रानेही आनंद व्यक्त केला आहे. व्हेंटीलेटर मधू चोप्राने प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवार्डसाठी १५व्या कॅटेगरीवर नॉमिनेट करण्यात आले होते.