प्रियंका चोप्रामुळं झाला दीर जो आणि GOT अभिनेत्रीचा घटस्फोट? नवीन माहिती आली समोर
सोफी टर्नर आणि जो जोनास यांच्या घटस्फोटाची बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली आहे. तेव्हापासून त्यांच्यात मतभेदाबाबत बरीच अटकळ बांधली जात आहे.
मुंबई : सोफी टर्नर आणि जो जोनास यांच्या घटस्फोटाची बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली आहे. तेव्हापासून त्यांच्यात मतभेदाबाबत बरीच अटकळ बांधली जात आहे. सोफी आणि जोच्या घटस्फोटामागील कारणाचा दावा करणारी अफवा तिची वहिनी आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याशी सतत होणारी तुलना आहे. कॉस्मोपॉलिटनने दिलेल्या वृत्तानुसार, एका स्रोताने पोर्टलवर दावा केला आहे की, बॉलीवूड अभिनेत्रीशी सतत तुलना केल्यामुळे सोफी खूप दबावाखाली होती आणि त्यामुळे तिच्यावर याचा परिणाम होत आहे. जोनासच्या सततच्या तुलनामुळे सोफी खूप अस्वस्थ होत होती.
असा दावा केला जात आहे की, सोफीला सुरुवातीला या तुलनेशी काही हरकत नव्हती. कारण जोनास कुटुंबाला असं वाटत होतं की, जो देखील निक जोनास सारखं सेटल होईल कारण ते समानच वयाचे आहेत. जेव्हा की, सोफीला असं वाटतं की, ती फक्त 27 वर्षांची आहे. आणि अद्याप ती लग्न करण्यास योग्य नाही. तिचं आधीच आयुष्य चांगलं होतं. याचबरोबर तिने आपले सगळं तरुणपण कामात घालवलं पाहिजे, म्हणून तिने घटस्फोट घेण्याची निर्णय घेतला.
प्रियांका चोप्राची वहिनीसोबत होत होती तुलना
वयाच्या 19 वर्षांत तिने जो जोनास्लाला डेट करायला सुरुवात केली. 23 वर्षांत सोफीने लग्न केलं. या कपलच्या वयात 7 वर्षांचा फरक आहे आणि अनेकदा असा दावा केला जातो की, जो वयातील फरकामुळेच तो प्रत्यक्षात तिच्यावर प्रभावित झाला होता. जे की, त्याचं कुटुंब त्याच्यासाठी अधिक व्यवस्थित जीवन ईच्छित होते. आणि त्यांना असं वाटलं की ती त्याच्यासाठी खूप लहान आहे.
सोफी आणि जो यांनी त्यांच्या विभक्त झाल्याची घोषणा एका निवेदनाद्वारे केली, "आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचाचा निर्णय घेतला आहे. 'लग्नाच्या चार वर्षांनंतर, आम्ही आमचं लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे.' का याविषयी बरेच तर्क लावले जात आहेत. पण , प्रत्यक्षात, हा सर्वानुमते निर्णय आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की प्रत्येकजण आमच्या गोपनीयतेसाठी आणि आमच्या मुलांच्या इच्छेचा आदर करेल."जो आणि सोफी यांना विला आणि डेल्फीन या दोन मुली आहेत आणि चार वर्षांनंतर त्यांनी त्यांचं लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे.