Salman Khan Saved Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्रियांका फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचं अनफिनिश्ड हे पुस्तक प्रदर्शित झालं होते. यावेळी प्रियांकानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी प्रियांकानं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. झूमनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, प्रियांकानं तिच्या पुस्तकात एका गाण्याच्या शुटिंगचा धक्कादायक किस्सा सांगितला. या गाण्यासाठी प्रियांकाला तिचे कपडे काढण्यास सांगितल्याचा खुलासा तिनं केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर प्रियांकाला एक गाणं शूट करायचं होते. या गाण्यात प्रियांकाला तिचे कपडे काढावे लागणार होते. या गाण्याचं शूट करत असताना तिला तिची पॅन्टी दाखवण्यास सांगितलं. प्रियांका म्हणाली की, ते चार मिनिटांचं गाणं असल्यामुळे तिनं दिग्दर्शकाला सांगितलं की मी कपड्यांचे थर घालायला हवे. त्यावर उत्तर देत दिग्दर्शक म्हणाला की तू स्टायलिशची बोल. प्रियांका स्टायलिशकडे जाताच त्यानं सांगितलं की तिला तिचे पॅन्टी दाखवावी लागेल नाही तर प्रेक्षक चित्रपट पाहायला का येतील? हे ऐकून मी तो प्रोजेक्ट सोडला. 



प्रियांकानं पुढे सांगितलं की, मी आधीच त्या चित्रपटासाठी दोन दिवस शूट केलं होतं. त्यामुळे मी ज्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करत होती त्या सेटवर चित्रपटाच्या सेटवर तो रागात आला. त्याला पाहून माझ्या बचावासाठी सलमान खान पुढे आला. त्याकाळात सलमान (Salman Khan) हा सुपरहिट अभिनेता होता. इतकंच काय तर तिला अजून माहित नाही की सलमान त्या निर्मात्याला काय म्हणाला.प्रियांकानं कबूल केलं की तिनं चित्रपट का सोडलं याच कारण निर्मात्यांना कधीच सांगितलं नाही. 


हेही वाचा : Janhvi Kapoor ला पब्लिक प्लेसमध्ये केलेलं हे कृत्य पडल महागात, अभिनेत्रीनं केला स्वत: खुलासा


जगात आपल्या यशावर आनंदी होणारे फार कमी लोकं असतात. या पॉडकास्टमध्ये माहितीसाठी प्रियांका म्हणाली, 'यशस्वी होण्यासाठी मी कोणतीही दानवी पूजा केलेली नाही.' यशाबद्दल रंगलेल्या अफवांबद्दल देखील प्रियांकाने स्पष्टीकरण दिलं. 'माझ्या करियरमध्ये काही अशी लोकं आली, ज्यांना कायम असं वाटायचं मी अयशस्वी व्हावं. मला काम मिळू नये म्हणून देखील त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण मी कधीही माघार घेतली नाही...'


प्रियांका चोप्रा लवकरच (priyanka chopra movies) एव्हेंजर्सचे दिग्दर्शक रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय प्रियांका 'लव्ह अगेन', 'जी ले जरा' या सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.