मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेची (Radhika Apte) गणना बॉलिवूडच्या बिंधास्त अभिनेत्रींमध्ये केली जाते. राधिकानं 'सेक्रेड गेम्स', 'लस्ट स्टोरीज', 'अंधाधुन', 'फोबिया' अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच राधिका 'विक्रम वेधा'मध्ये हृतिक रोशनसोबत दिसली होती. राधिकाच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि आता तिने लॉन्ग डिस्टेन्स लग्नाबद्दल बरेच काही सांगितले आहे.


आणखी वाचा : Amitabh Bachchan वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणणार स्वत:बाबतचं सर्वात मोठं गुपित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिकानं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितलं आहे. राधिकानं 2012 मध्ये ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. त्याविषयी बोलताना राधिका म्हणाली, साथीच्या आजारापूर्वी ते 2020 पर्यंत म्हणजे सुमारे 9 वर्षे लॉन्ग डिस्टेन्समध्ये होते. राधिका आता तिचा बहुतांश वेळ लंडनमध्ये घालवते. 'विक्रम वेधा'च्या प्रमोशनसाठी नुकतीच भारतात परतलेल्या राधिकानेही तिच्या लग्नाविषयी माहिती दिली आहे. (Radhika Apte Opened About Her Long Distance Marriage With British Musician Benedict Taylor Know Everything) 


बातमीची लिंक : ...म्हणून नशेच्या आहारी गेली होती पूजा भट्ट


राधिका म्हणाली, 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप खरंच कठीण आहे. दोघांनीही त्यांच्या नात्यात सगळ्या गोष्यी समजून घ्यायला हव्या. राधिका म्हणाली, 'कोरोनापूर्वी मी लाँग डिस्टन्स लग्नात होते. आता आम्ही एकमेकांसोबत खूप वेळ घालवत आहोत. आमच्या लग्नाचा हा दुसरा अध्याय आहे. सुरुवातीला दूर राहणं खूप दुःखदायक होतं, ही खूप वाईट परिस्थिती असते. आता मला असं वाटतं की, मी त्याच्यापासून क्षणभरही दूर राहू शकणार नाही कारण ते खूप वेदनादायक आहे. आता आम्ही एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहोत.


आणखी वाचा : 'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर


राधिका तिच्या लग्नाबद्दल पुढे म्हणाली, 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप खरोखरच कठीण आहे, परंतु जर तुम्हाला त्यावर काम करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. आम्ही देखील ते केले, परंतु आम्ही हे कसं केलं हे मला माहित नाही. आम्हाला एकमेकांची कंपनी हवी होती. अशा रिलेशनशिपसाठी एकमेकांना स्पेस देणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि मग दुसऱ्यांना स्वीकारा. या गोष्टी मी इतर यशस्वी रिलेशनशिपमधून शिकले आहे.