...म्हणून नशेच्या आहारी गेली होती पूजा भट्ट

जाणून घ्या असं काय झालं होतं. 

Updated: Oct 10, 2022, 12:52 PM IST
...म्हणून नशेच्या आहारी गेली होती पूजा भट्ट title=

मुंबई : 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यापैकी एक म्हणजे पूजा भट्ट (Pooja Bhatt) होती. पूजाचं नाव त्याकाळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'डॅडी' चित्रपटातून पूजानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1989 मध्ये आलेला हा चित्रपट पूजाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी बनवला होता. मात्र, पूजाला खरी लोकप्रियता ही 'ऐ दिल है की मानता नहीं' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळाली होती. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan) आणि पूजा भट्ट यांची जोडी दिसली आणि हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाच्या रिलीजनंतर पूजा अनेक हिट चित्रपटांमध्येही दिसली होती.

आणखी वाचा : 'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

मात्र, पूजाच्या फिल्मी करिअरला वेग आला असतानाच ती एका वादामउळे चर्चेत आली होती. पूजाचा तिचे वडील महेश भट्ट यांच्यासोबतचा एक फोटो मॅगधिनमध्ये छापण्यात आला होता. ज्यावरून बराच वाद झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा वाद सुरू होता तेव्हाच, महेश भट्ट यांनी पूजा आपली मुलगी नसती तर तिच्याशी लग्न केले असते असे सांगून आणखी खळबळ उडवून दिली होती. मात्र, पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. खरं तर पूजाला दारू पिण्याचे गंभीर व्यसन होते. पूजाचे लग्न मनीष मुखिजा नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. मात्र, हे लग्न केवळ 11 वर्षे टिकलं, त्यानंतर तिचा आणि मनीषचा घटस्फोट झाला. (pooja bhatt turned alcoholic due to this reason got this warning from doctor) 

आणखी वाचा : सरोगेसी की अडॉप्शन? बाळाला हातात घेण्याआधीच नयनतारा ट्रोलिंगची शिकार

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : अजय देवगणला मुलगा युगनं लगावली होती कानशिलात, पाहाताच कुटुंबातील सदस्यांना बसला होता धक्का

घटस्फोटानंतर पूजा डिप्रेशनमध्ये होती आणि ती खूप मद्यपान करू लागली, तिचा एक दिवस देखील दारूशिवाय पूर्ण होत नव्हता. मात्र, तब्येत बिघडल्यानं आणि डॉक्टरांच्या इशाऱ्यांनंतर पूजानं 2016 पासून दारू पिणं बंद केलं होतं. पूजानं दारू सोडली नाही तर तिचा मृत्यू होऊ शकतो, असे डॉक्टरांनी तिला सरळ शब्दात सांगितले होते. यानंतर पूजानं स्वतःला दारूपासून पूर्णपणे दूर केलं आणि ती आता दारूला हात लावत नाही.