Amitabh Bachchan वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणणार स्वत:बाबतचं सर्वात मोठं गुपित

अमिताभ बच्चन लवकरच हा खुलासा करणार आहे. 

Updated: Oct 10, 2022, 02:12 PM IST
Amitabh Bachchan वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणणार स्वत:बाबतचं सर्वात मोठं गुपित

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ सध्या छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' शोचं सुत्रसंचालन करत आहेत. यावेळी अमिताभ एका खास शैलीत स्पर्धकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता अमिताभ यांच्या बर्थडे स्पेशल एपिसोडमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी हजेरी लावणार आहेत.  

बातमीची लिंक : ...म्हणून नशेच्या आहारी गेली होती पूजा भट्ट

आतापर्यंत अमिताभ बच्चन स्पर्धकांना फक्त प्रश्न विचारताना दिसले आहेत. पण आता शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत आणि मेगास्टारची पत्नी जया बच्चन प्रश्न विचारणार आहेत. ( kaun banega crorepati 14 amitabh bachchan 80th birthday special episode get emotional)

आणखी वाचा : 'ढोंगी', इराणी महिलांना पाठिंबा दिल्यामुळे प्रियांका चोप्रा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जया बच्चन अमिताभ यांना प्रश्न विचारतात की 'जर टाइम मशीन असेल तर कोणत्या वर्षी परत जायला आवडेल आणि का?' या प्रश्नावर अमिताभ बच्चन म्हणतात 'मला जायला आवडेल….अमिताभ इतकं बोलतात आणि तितक्यात  एक ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ प्ले होतो. व्हिडिओमध्ये एका घराची झलक दाखवण्यात आली आहे. ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ पाहून असं वाटतं की अमिताभ बच्चन आपल्या पालकांशी संबंधित काही रहस्य उघड करतील. यावर बोलताना अमिताभही खूप भावूक होतात. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.

आणखी वाचा : सरोगेसी की अडॉप्शन? बाळाला हातात घेण्याआधीच नयनतारा ट्रोलिंगची शिकार

व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हरमध्ये असे म्हटले आहे. 'अमितजींनी असं काय सांगितलं जे त्यांनी आजपर्यंत कोणालाच सांगितले नाही. मात्र, आता अमिताभ त्यांच्या आयुष्यातील कोणते रहस्य उघड करणार आहेत, हे शो टेलिकास्ट झाल्यानंतरच कळेल.

आणखी वाचा : अजय देवगणला मुलगा युगनं लगावली होती कानशिलात, पाहाताच कुटुंबातील सदस्यांना बसला होता धक्का

'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर जया यांनीही अमिताभ यांना खास सरप्राईज दिलं. जया अनेक संगीतकारांसह शोमध्ये पोहोचल्या. KBC च्या मंचावर तुम्हाला आगामी भागात एक संगीतमय कार्यक्रम देखील पाहायला मिळणार आहे. पत्नीचे हे सरप्राईज पाहून अमिताभ देखील भावूक होतात. तेव्हा अमिताभ बोलतात, माझ्याकडे शब्द नाहीत... पण आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही.'