मुंबई : चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्याचा मार्ग  स्वीकारला आहे. या यादीत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींचाही समावेश आहे. प्लास्टिक सर्जरी झाल्यावर सेलिब्रिटी या विषयी जाहिरपणे सांगत नाहीत, तर उलट आपल्या सौंदर्याचे कारण उत्तम आहार आणि योगा आहे असं सांगतात. पण नुकतंच अभिनेत्री राधिका आपटेने प्लास्टिक सर्जरीबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केलं आहे. चेहऱ्यावर होणारे वृद्धत्वाचे परिणाम लपवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी ही सेलिब्रिटींसाठी सामान्य गोष्ट कशी झाली आहे हे तिने उघडपणे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत राधिका म्हणाली की, चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांची मागणी कमी झाली आहे. सगळे लोक चित्रपटांमध्ये तरुण आणि सुंदर चेहऱ्याच्या शोधात आहेत. त्याच वेळी, स्टार्स देखील चित्रपटाच्या पडद्यावर टिकून राहण्यासाठी त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. काही सेलिब्रिटी आपले म्हातारपण लपवण्यासाठी प्लास्टिक सर्जनची मदतही घेतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राधिकाने सांगितले की, तिच्यासोबत असे अनेकदा घडले आहे, जेव्हा तिला एका तरुण अभिनेत्रीमुळे भूमिका गमवावी लागली आहे. राधिका म्हणाली की, 'चित्रपटांमधील भूमिका गमावल्यानंतरही तिनं आजपर्यंत कधीही प्लास्टिक सर्जरीचा पर्याय निवडला नाही. तिनं सांगितले की तिने अनेक सहकलाकार आहेत ज्यांनी अनेकदा शस्त्रक्रिया केली आहे. पण ती नेहमीच त्यापासून दूर राहते.' (radhika apte said people used to suggest plastic surgery for films in bollywood know more) 
 
राधिका पुढे म्हणाली की 'वय हा एक महत्वाचा घटक आहे. त्याच वेळी, व्यावसायिक चित्रपटांमध्ये तरुण अभिनेत्रींना कास्ट करण्याची मागणी जास्त असते हे नकारता येणार नाही. राधिका म्हणाली की, इंडस्ट्रीत असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा समोरच्या व्यक्तीला सांगितले जाते की तुमच्यामध्ये शारीरिक दृष्ट्या अमुक गोष्ट नाही आणि आम्हाला हे हवं आहे. अनेक कलाकार त्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग अवलंबतात पण मी असे काही करू शकत नाही असे राधिकाने स्पष्ट केले. 


राधिका पुढे म्हणाली की, शस्त्रक्रिया करणे ही इंडस्ट्रीमध्ये एक सामान्य गोष्ट बनली आहे आणि हे  केवळ भारतातच नाही तर ती संपूर्ण जगात आहे. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लोक आहेत जे याचा सामना करत आहेत. लोक हार मानतात आणि स्वतःसाठी काहीतरी करायला लागतात. राधिका नुकतीच 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटात दिसली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत.