Radhika Merchant : अंबानी कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतं. काही महिन्यांपूर्वी अंबानी कुटुंबातील सगळ्यात छोट्या अनंत अंबानीनं राधिका मर्चेंटशी लग्न केलं. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगपासून त्यांचं लग्न आणि लग्नानंतरचे कार्यक्रम हे सतत चर्चेत होते. त्यानंतर ते गणेशोत्सवामुळे चर्चेत आले होते. आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण राधिकाचा वाढदिवस आहे. राधिकाचा लग्नानंतरचा हा पहिला वाढदिवस आहे. या सेलिब्रेशनमध्ये अंबानी कुटुंबानं बॉलिवूड सेलिब्रिटींपासून धोनीला देखील बोलावलं होतं. या पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडिया स्टार ऑरीनं शेअर केले आहेत. या व्हिडीओनं सगळ्याचं लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिकानं तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला आहे. राधिकानं संपूर्ण अंबानी कुटुंबासोबत साजरा केलेला हा पहिला वाढदिवस आहे. तर राधिकानं परिधान केलेल्या या कपड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. व्हाइट हॉल्टर नेक टॉप आणि रेड स्कर्टमध्ये राधिका खूप सुंदर दिसत होती.  व्हिडीओमध्ये राधिकासोबतचं संपूर्ण अंबानी किती उत्सुक आहे ते पाहायला मिळत आहे. केक कापल्यानंतर ती संपूर्ण कुटुंबाला केक भरवताना दिसते. राधिकाचा हा वाढदिवस अंबानींच्या घरी अर्थात अ‍ॅन्टिलियामध्ये साजरा करण्यात आला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

राधिकाचा वाढदिवसाच्या पार्टीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या ऑरीनं शेअर केला आहे. त्या व्हिडीओत ऑरी, राधिका, अनंत, रणवीर सिंग, महेंद्र धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आणि शिखर पडाहिया, खूशी कपूर त्यासोबत अनन्या पांडे, आर्यन खान आणि सुहाना खान हे एका टेबलवर बसल्याचे दिसून येतयं. त्याशिवाय या पार्टीत जान्हवी कपूर, अॅटली, वीर पहाडिया, अर्जुन कपूर देखील या पार्टीत दिसले. त्याचे फोटो ऑरीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केले आहेत. तर व्हिडीओ शेअर करत ऑरीनं कॅप्शन दिलं आहे. कोणीच माझ्याशी नीट वागलं नाही. तर त्यावर कमेंट करत खूशी कपूर म्हणाली, कोणीची परफेक्ट नाही. त्याशिवाय या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी आर्यनची स्तुती केली आहे. आर्यन किती सुंदर दिसतोय हे अनेकांनी यावेळी म्हटलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा :अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली मलायका- 'मला काहीच पश्चाताप नाही!'


अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट हे दोघं 12 जुलै रोजी लग्न बंधनात अडकले आहेत. जियो वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत - राधिका यांच्या शाही विवाहसोहळ्याची सगळीकडे चर्चा सुरु होती.