मुंबई : बिग बॉसमधील स्पर्धक राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडमध्ये लग्नांचा सिझन असताना राहुल महाजन कसा मागे राहिलं. राहुल महाजनने तिसरं लग्न केलं आहे. खूप वर्षांअगोदर दुसरी पत्नी डिम्पी गांगुलीला घटस्फोट दिल्यानंतर बराच काळ एकट्याने घालवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलला यानंतर तिसऱ्या परफेक्ट लाइफ पार्टनरचा शोध होता. पण आता तो शोध संपला आहे. मॉडेल नताल्या इलीनाच्या रुपात त्याला योग्य जीवनासाथी मिळाली आहे. 


नताल्या ही कजाकिस्तानमधील असून या दोघांनी 20 नोव्हेंबर रोजी एका खाजगी समारंभाच्या माध्यमातून लग्न केलं आहे. आता या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. 


राहुलने आपली गर्लफ्रेंड नताल्यासोबत मालाबार हिलमधील एका मंदिरात लग्न केलं आहे. या लग्नाला फक्त त्याच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होती. त्यामुळे हा अतिशय खाजगी सोहळा होता. 



राहुल महाजनने आपल्या तिसऱ्या लग्नाबद्दल सांगताना म्हटलं की, या अगोदर मी माझी दोन्ही लग्न अतिशय धुमधडाक्यात केली. पण ते नातं काही टिकलं नाही. म्हणून मी तिसरं लग्न अतिशय साधेपद्धतीने करत आहे. 


मी नताल्याला एका वर्षापासून ओळखतो. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. नताल्याला आपला बिझनेस सुरू करायचा असून माझा पूर्ण पाठिंबा दिला आहे असं राहुल महाजनने सांगितलं आहे. 


राहुलपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे तिसरी पत्नी 


नत्याला 25 वर्षांची असून राहुल महाजनचं वय आता 43 वर्षे आहे. दोघांमध्ये 18 वर्षांच अंतर आहे. राहुलला वयाबाबत विचारणा केली असता, त्याने सांगितलं की, आम्ही एकत्र खूप चांगला वेळ घालवतो. डिम्पी देखील राहुलपेक्षा 10 वर्षांनी लहान होती. 


सर्वात पहिली पत्नी बालपणीची मैत्रिण


राहुल महाजनचं पहिलं लग्न बालपणीची मैत्रिण श्वेता सिंहसोबत झालं होतं. श्वेताने राहुलवर शारीरिक शोषणाचे आरोप लावले होते. यानंतर हे लग्न मोडलं. त्यानंतर राहुलने स्वयंवर शोमध्ये दुसरं लग्न केलं. आणि आता तिसरं लग्न