मुंबई : बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि दिशा परमार अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.  सात फेरे घेत दोघांनी एकमेकांना सात ही जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलं आहे. या जोडीच्या लग्नातील खास क्षण समोर आले आहेत. 
काही मोजक्या लोकांच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पडला आहे. दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यावेळी लग्नमंडपात दिसून आले. सध्या सोशल मीडियावर या नवविवाहीत जोडप्याचीच चर्चा रंगली आहे.  दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगून जात आहे.




राहुलचा मित्र अलीची लग्नात खास हजेरी 
बिग बॉसच्या घरात अली आणि राहुल यांची चांगली मैत्री दिसून आली . अली राहुल आणि दिशाच्या लग्नासाठी सुरुवातीपासूनच खूप उत्साही होता. बिग बॉस 14 दरम्यान राहुलने दिशा परमारला प्रपोज केलं होतं. दिशाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बिग बॉसच्या घरात जाऊन राहुलसमोर आपल्या प्रेमाची कबुली सगळ्यांसमोर दिली होती.