Raj Thackeray : राज ठाकरे यांचं नाव स्वरराज वरून राज ठाकरे कसं पडलं?, असा प्रश्न सुबोध भावे यांनी विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी मजेशीर उत्तर दिलं. माझं खरं नाव स्वरराज ठाकरे (Swarraj Thackeray) हे होतं. मात्र, बाळासाहेबांच्या  (Balasaheb Thackeray) सांगण्यावरून मी व्यगंचित्र काढू लागलो. त्यावेळी मी व्यगंचित्र काढताना मी त्यावर स्वरराज हे नाव टाकत होतो. त्यावेळी बाळासाहेबांनी मला एक सल्ला दिला, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी माझ्या व्यंगचित्राची सुरूवात बाळ ठाकरे (Bal Thackeray) नावावरून केली, तू राज ठाकरे नावाने कर, असं बाळासाहेब मला म्हणाले, असा किस्सा राज ठाकरे यांनी यावेळी सांगितला. माझे वडिल संगितकार होते, त्यामुळे मुलगा संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, असं त्यांना वाटत होतं. मात्र, मला वेगळेच राग येऊ लागले, असं राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरे यांच्या य़ा वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. मात्र, पासपोर्टवर अजूनही नाव स्वररराज ठाकरे असंच आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बाळासाहेबांनी मला राज ठाकरे नाव दिलं आणि माझं कॉलेजमध्ये असताना बारसं झालं, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.


आणखी वाचा - हर हर महादेव !शिवप्रेमी राज ठाकरेंच्या आवाजात घुमणार महागर्जना !


दरम्यान, हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटाला राज ठाकरे यांनी व्हाईस ओव्हर दिला आहे. त्यामुळे, मला हर हर महादेव या चित्रपटाला आवाज देण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद, असं म्हणत राज ठाकरे यांनी आभार देखील मानले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर जीवनावर एक चित्रपट येऊच शकत नाही, त्यावर अनेक चित्रपट होतील, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.