नवी दिल्ली : पद्मावत चित्रपट विरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 


काय आहे याचिका?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टाने या राज्यातील सिनेमावरील बंदी उठवली होती. आता पद्मावत चित्रपटावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या (मंगळवारी) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची बाजू ऐकावी, कोर्टाने निर्णयावर फेरविचार करावा, असे या याचिकेत राजस्थान, मध्य प्रदेश सरकारने म्हटले आहे.



निर्माते कोर्टाच्या दारात 


‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना चार राज्यात घालण्यात आलेल्या बंदी विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. यावर निकाल देत चारही राज्यातील बंदी कोर्टाने उठवली होती. त्यानंतरही करणी सेनेचा या सिनेमाला विरोध कायम आहे. 


सिनेमागृहाला आग


करणी सेनेनं राजस्थानात संजय लीला भन्साळी यांच्या येण्यावरच स्वयंघोषित बंदी घातलीय. इतकंच नाही तर सिनेमाचा विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी रात्री काही लोकांनी एका सिनेमाघरातल्या तिकीट काऊंटरलाच आग लावून दिली. ही घटना फरीदाबादच्या वल्लभगड इथं घडलीय.