चीनमध्ये १० ते १५ हजार स्क्रीनवर रिलीज होणार रजनीकांत आणि अक्षयचा ‘२.०’
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘२.०’ रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. या सिनेमाची रिलीज डेट आधीच अनेकवेळा पुढे ढकलली गेली आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘२.०’ रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. या सिनेमाची रिलीज डेट आधीच अनेकवेळा पुढे ढकलली गेली आहे.
अखेर या सिनेमाची रिलीज डेट आता पुढील वर्षी जानेवारीमध्ये ठरवण्यात आली आहे.
‘२.०’ हा ‘बाहुबली’नंतरचा सर्वात मोठा सिनेमा असल्याची चर्चा होत आहे. या सिनेमात रजनीकांत हिरो आणि अक्षय कुमार हा व्हिलनच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हा सिनेमा जास्तीत जास्त सिनेमांमध्ये रिलीज करण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. ट्रेड एक्सपर्ट रमेश बाला यांनी ट्विट करून नुकतीच माहिती दिली की, हा सिनेमा चीनमध्ये तब्बल १० ते १५ स्क्रीनवर रिलीज केला जाणार आहे.
चीनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातील स्क्रीनवर एखादा सिनेमा रिलीज करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा चीनमध्ये रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाला तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. आता ‘२.०’ हा सिनेमा चीनमध्ये रिलीज कधी करणार याची माहिती समोर आली नाहीये. पण आधी हा सिनेमा भारतात रिलीज होईल आणि नंतर चीनमध्ये, असे बोलले जात आहे.