Dipika Chikhlia Trolled For Dance Over Playing Seeta Role In Ramayana : छोट्या पडद्यावरील 'रामायण' (Ramayana) या मालिकेनं 80 च्या दशकात प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. फक्त तेव्हाच नाही तर 2020 मध्ये झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, ही मालिका पुन्हा एकदा दाखवण्यात आली होती. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. फक्त चाहते नाही तर काही प्रेक्षकांनी या मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना देवाचे स्थान दिले. त्याचे बरेच व्हिडीओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिलेच आहेत. दरम्यान, या मालिकेच सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना खूप ट्रोल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका यांनी हा व्हिडीओ त्यांच्या (Dipika Chikhlia Instagram) इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपिका यांनी पिवळ्या रंगाचा पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे. यावेळी दीपिका या ‘ओ मेरे शोना रे’ गाण्यावर डान्स करत आहेत. मात्र, दीपिका यांचा हा लूक आणि त्यांनी केलेला डान्स पाहता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. सीतेची भूमिका साकारणाऱ्या स्त्रीला असे काही शोभत नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. (Dipika Chikhlia Viral Video) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिका यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'कदाचित तुला सीता मातेच्या भूमिकेनं मिळालेला मानसन्मान पुरेसा नाही. अरूण गोविल यांच्याकडून काही शिक.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'माताजी, तुला अनफॉलो करतोय. कारण मी तुम्हाला अशा अवतारात बघू शकत नाहीये.' तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हे माते! काहे अपनी सम्मानित छवि बदल रही है ढलती उम्र में.' आणखी एक नेटकरी म्हणाला, तुम्ही असा घाणेरडा डान्स का करत आहात? अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी दीपिका यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. (Dipika Chikhlia Got Trolled)


हेही वाचा : दिग्दर्शकानं मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली; Neena Gupta यांचा धक्कादायक खुलासा


दीपिका यांनी फक्त 'रामायण' मालिकेत काम केलं नाही तर ‘रामायण’ या मालिकेनंतर दीपिका यांनी 'विक्रम वेताळ' (Vikram Vetal), 'लव कुश' (Luv Kush) या मालिकांमध्येही काम केले.1991 मध्ये दीपिका या राजकारणातही आल्या. ‘रामायण’ मुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या बळावर दीपिका यांनी 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. पण, काही वर्षांनी दीपिका यांनी राजकारणाचाही निरोप घेतला.