Neena Gupta Reveals Director Absued Her : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना गुप्ता या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नीना गुप्ता यांनी त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड स्ट्रगल केलं. मोठ्या पडद्यापासून OTT पर्यंत सगळीकडे त्यांचं आज वर्चस्व आहे. नीना गुप्ता या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी बऱ्याचवेळा त्यांच्यासोबत चित्रपटाच्या सेटवर आलेल्या धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीना यांनी एका मुलाखतीत असाच एक किस्सा शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकानं सगळ्यांसमोर आई-बहिणीची शिवीगाळ केल्याचे सांगितले.
नीना गुप्ता यांनी 1980 पासून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. परंतु काही वर्षांपूर्वीच नीना यांना एका चित्रपटानं ओळख मिळवून दिली. एका मुलाखतीत याविषयी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, 1980 च्या दशकात काम करण्याचं जे कल्चर होतं ते खूप वाईट होतं.
हेही वाचा : Rajesh Khanna यांची वरात गर्लफ्रेंडच्या दारात; त्यांना नाकारणारी अभिनेत्री कोण?
बॉलिवूड बबलला नीना गुप्ता यांनी ही मुलाखत दिली होती. त्यावेळी नीना गुप्ता यांना विचारण्यात आले की त्यांच्या काळातील चित्रपटसृष्टीतील कोणता विचित्र किस्सा आठवतो का? त्याविषयी बोलताना नीना म्हणाल्या, "मी एक चित्रपट करत होते आणि त्यात माझी खूप छोटी भूमिका होती. माझ्याकडे एका सीनमध्ये फक्त 2-3 डायलॉग होते. मी एका मोठ्या ग्रुपमध्ये होते. शूटिंगच्या दिवशी माझे डायलॉग्स देखील काढून टाकले. त्यामुळे माझी भूमिकाच राहिली नाही."
पुढे नीना म्हणाल्या, मी दिग्दर्शकाकडे गेले आणि विचारले "माझ्याकडे फक्त दोनच ओळी आहेत आणि तुम्ही त्याही काढून टाकल्या. त्याने मला सर्वांसमोर आई आणि बहिणीवरून शिवीगाळ केली. त्यावेळी विनोद खन्ना (Viond Khanna), जुही चावला (Juhi Chawla) तेथे उपस्थित होते. फक्त तेच नाही तर तिथे आणखी बरेच लोक उपस्थित होते दिग्दर्शकानं सगळ्यांसमोर मला शिवीगाळ केली हे पाहून मी रडू लागले."
तेव्हा नीना गुप्ता या घटनेवर हसल्या आणि म्हणाल्या की, "आता वर्क कल्चर राहिलेले नाही. मला वाटत नाही की आज कोणी असं करेल किंवा कोणासोबत आज असं घडलं असेल. आज मला कोणी आई-बहिणीवरून शिवीगाळ करणार नाही."
दरम्यान, नीना या सगळ्यात शेवटी 'गूडबाय' या चित्रपटात दिसल्या. या आधी त्या सरदार का '83', ‘ग्रॅंड सन’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. या व्यतिरिक्त त्यांनी ‘मसाबा मसाबा’ आणि 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये ही काम केले आहे.