Ranbir Alia Wedding: ऋषी कपूर यांची मुलाच्या लग्नात अनोखी उपस्थिती
मुलाच्या लग्नात अशा प्रकारे ऋषी कपूर यांची उपस्थिती... नितू कपूर यांनी फोटो केला शेअर...
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट अखेर एकत्र आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा तुफान रंगत आहेत. बुधवारी आलिया आणि रणबीरचा मेहंदी सोहळा जोरदार रंगला. आज कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण रणबीरमुळे आहे. चेहऱ्यावर आनंद दाखवणाऱ्या कपूर कुटुंबामध्ये काही प्रमाणात दुःख देखील आहे. कारण गेल्या वर्षी अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं...
पण नितू कपूर यांत्या मेहंदीमध्ये आणि मनात मात्र ते अद्यापही जिवंत आहे. नितू कपूर यांनी त्यांच्या मेहंदीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ऋषी कपूर यांचं नाव लिहिलं आहे.
सध्या नितू कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 1980 साली ते विवाह बंधनात अडकले होते. ऋषी आणि नीतू यांनी 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
ऋषी आणि नीतू यांना दोन मुलं आहेत. रणबीर कपूर आणि रिधिमा कपूर अशी त्यांची नावे आहेत. ऋषी आणि नीतू 'खेल खेल में', 'रफू चक्कर', 'कभी कभी', 'अमर अकबर एंथनी', 'दुनिया मेरी जेब में', 'जहरीला इंसान', 'जिंदा दिल', 'दूसरा आदमी', 'अनजाने में' और 'झूठा कहीं का' या चित्रपटांच्या माध्यमातून एकत्र झळकले होते.
1970 ते 1990 हा काळ ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. 'अमर अकबर अँथोनी', 'कुली', 'कर्ज' या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या.
आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. 'हम तुम', 'अग्निपथ', 'कपूर अँण्ड सन्स' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.