Wedding News : लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडणार करिनाची होणारी वहिनी; महत्त्वाच्या व्यक्तीकडून माहिती उघड
रणबीर आणि आलियानं अखेर त्यांच्या नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय़ घेतला आहे
मुंबई : सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकाच लग्नाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा म्हणजे कपूर कुटुंबातील हँडसम हंक रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नाची. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानतंर रणबीर आणि आलियानं अखेर त्यांच्या नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय़ घेतला आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding)
सध्या दोघांच्याही कुटुंबांमध्ये लग्नाचीच लगबग सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. राहिला प्रश्न असा की, कपूर कुटुंबातील इतर सुनांप्रमाणे आलियाही लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर जाणार ?
आलियाचं ठाऊक नाही, पण करिनाची आणखी एक होणारी वहिनी मात्र लग्नानंतर कलासृष्टीपासून दूर जाऊ शकते.
अभिनेता आदर जैन याच्योबत रिशेनशिपमध्ये असणारी ताराही येत्या काळात विवाहबंधनात अडकण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या वर्षी ही जोडी लग्न करणार असल्याचं भाकीत एका मोठ्या ज्योतिषींनी केलं आहे.
तारा आणि आदर यांचं नातं फार परिपक्वं असेल. ते हे नातं सुरेखपणे निभावतील असं या ज्योतिषांनी म्हटलं. त्यांच्या बोलण्यात आणखी एका गोष्टीचा उल्लेख लक्ष वेधणारा ठरला.
हा उल्लेख म्हणजे आदर जैन येत्या काळात अभिनयाकडून चित्रपट निर्मितीकडे वळू शकतो. इतकंच नव्हे, तर ताराही लग्नानंतर अभिनयापासून दुरावली जाऊ शकते. येत्या काळात ती इंटेरियर डिझायनिंग किंवा फॅशन डिझायनिंग या क्षेत्रांत काम करु शकते अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
तारा आणि आदर शक्य तितका जास्त वेळ त्यांच्या नात्याला देताना दिसतात. त्यामुळं आता कपूर कुटुंबात रणबीर पाठोपाठ आदर आणि ताराही या वळणावर येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.