Ranbir Kapoor on being toxic husband tag : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'ॲनिमल'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक त्यांची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या सगळ्यात आता रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात त्यानं आलिया भट्टच्या लिपस्टिकविषयी असलेल्या वक्तव्यावर वक्तव्य करतं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर त्यानं दिलेल्या उत्तरानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओत तो एका चाहत्याशी बोलताना दिसत आहे. यावेळी रणबीर म्हणाला की 'मी सोशल मीडियावर नाही त्यामुळे मला कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा सामना करण्याची गरज पडत नाही आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पण माझ्यासाठी नकारात्मकता देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यातही सगळ्यात महत्त्वाची तेव्हा असते जेव्हा तुम्ही एक कलाकार असता. मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे, त्यामुळे आयुष्यात समतोल राहतो.' 


पाहा काय म्हणाला रणबीर - 



रणबीर पुढे याविषयी म्हणाला की 'कधी-कधी एक कलाकार असल्यामुळे तुमच्याविषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात, लिहिल्या जातात. पण हे गरजेचं नाही की सगळ्याच गोष्टी या खऱ्या असतील. माझी एक प्रतिमा आहे, जी मीडियाकडून बनवण्यात आली आहे. अनेकदा मी चित्रपटात ज्या भूमिका साकारल्या आहेत त्यावरून असते. त्या लोकांना या गोष्टीचा हक्क आहे, ज्यांना माझं काम आवडतं आणि ज्यांना माझं काम आवडतं नाही. माझं लक्ष हे फक्त माझ्या कामावर आहे.'


आलियाच्या लिपस्टिकच्या वक्तव्यावरून ट्रोल होण्यावर रणबीरची प्रतिक्रिया


रणबीर म्हणाला, 'नुकतंच मी एक बातमी वाचली होती, ज्यात माझ्याविषयीच्या एका वक्तव्यावरून मला टॉक्सिकचं टॅग देण्यात आलं होतं. मला हे सगळं कळतंय आणि मी त्या लोकांना पाठिंबा देतोय जे लोक टॉक्सिनेसच्या विरोधात लढत आहेत. जर यासाठी ते माझा चेहरा वापरत असतील तर हे ठीक आहे. कारण त्यांचा विरोधा हा माझ्याविषयी करण्यात आलेल्या एका वक्तव्यापेक्षा, त्यांना वाईट वाटण्याविषयी आहे.' 


रणबीर विषयी असं काय म्हणाली होती आलिया?


काही दिवसांपूर्वी आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तिनं खुलासा केला होता की पती रणबीरला तिनं लिपस्टिक लावलेलं मुळीच आवडतं नाही. आलिया म्हणाली होती की रणबीर नेहमी तिला लिपस्टिक काढण्यास सांगतो. त्यामुळे ती आता सगळ्यात जास्त न्यूड शेडची लिपस्टिक वापरते. आलियाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत रणबीरला ट्रोल केले होते. अनेकांनी त्याला टॉक्सिक नवरा असं म्हटलं होतं. तर काही लोकांनी त्याला आलियाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतो असं म्हटलं होतं.