`राहा 20 वर्षांची झाल्यानंतर मी तिच्यासोबत...`, Ranbir Kapoor ला सतावतेय लेकीची चिंता
मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी बाबा झाल्यानंतर रणबीरला सतावतेय `या` गोष्टीची चिंता; अखेर अभिनेत्याने बोलूनच दाखवलं
Ranbir Kapoor on Daughter Raha : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी नोव्हेंबरला त्यांच्या चिमुकलीचं स्वागत केलं. आलिया-रणबीरने त्यांच्या लेकीचं नाव राहा ठेवलं आहे. (ranbir kapoor alia bhatt marriage) सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने लेकीच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. राहाच्या जन्मानंतर आलिया-रणबीर सतत चर्चेत आहेत. मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. नुकताच रणबीरने लेकीबद्दल सतावत असलेली चिंता बोलून दाखवली. (ranbir kapoor alia bhatt age)
एका मुलाखतीत रणबीरला राहाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. 'मुलीच्या जन्मानंतर तुझ्या जीवनात काय बदल झाले आहेत?' यावर रणबीर म्हणाला, 'आता मी असा विचार करतो मी एवढा उशीर का केला? मी आधीच बाबा व्हायला हवं होतं.' पुढे रणबीरने लेकीबद्दल वाटत असलेली चिंता देखील व्यक्त केली. (ranbir kapoor alia bhatt baby)
वाचा | Sara Ali Khan चा महागड्या गाडीतून नाही, तर लोकल ट्रेनमधून प्रवास
अभिनेता म्हणाला, 'जेव्हा माझी मुलगी 20 वर्षांची होईल, तेव्हा मी 60 वर्षांचा असेल. मी तिच्यासोबत फुटबॉल खेळू शॉकेल? तिच्यासोबत पळू शकेल?' यावेळी रणबीरने मुलगी झाल्यानंतर झालेला आनंद व्यक्त केला. जो अभिनेत्याने पहिल्यांदा अनुभवला आहे. (ranbir kapoor and alia bhatt daughter)
मुलगी आणि करिअर कसं सांभाळतील रणबीर-आलिया
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. दोघेही कामाच प्रचंड व्यस्त असतात. पण आता राहाच्या जन्मानंतर दोघे सर्वकाही कसं सांभाळतील. यावर रणबीर म्हणाला, 'करियर आणि राहाला आम्ही महत्त्व देतो.' रणबीर 180 ते 200 दिवस काम करतो. आलिया रणबीरपेक्षा अधिक व्यस्त असते. (ranbir kapoor wife)
राहाला दोघे मिळून सांभाळतील जेव्हा रणबीर कामासाठी घराबाहेर असेल तेव्हा आलिया घरी राहून लेकीचा सांभाळ करेल आणि जेव्हा आलिया कामासाठी घराबाहेर असेल तेव्हा रणबीर घरी राहून लेकीचा सांभाळ करेल. ज्यामुळे राहाला आई-बाबा दोघांचं प्रेम अनुभवता येईल.