हे असणार संजय दत्तच्या बायोपिकचे नाव?
संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
मुंबई : संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीरनेही खूप मेहनत आहे. पण या चित्रपटाचे नाव काय असणार याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
संजय दत्तला हिंदी सिनेसृष्टीमध्ये 'संजू बाबा' म्हणून ओळखले जाते. अनेक जण त्याला 'संजू' म्हणूनही हाक मारतात. त्यामुळे 'संजू' हेच या चित्रपटाचे नाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय दत्तच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त घडामोडी घडल्या आहेत. त्याचे रेखाटन रूपेरी पडद्यावर कसे केले जाणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकुमार हिराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
संजय दत्तच्या भूमिकेच्या अभ्यास करताना त्याच्या देहबोलीचा, चालण्याच्या, वागण्याच्या ढबीचा जितका अभ्यास केला गेला. त्याप्रमाणे संजय दत्तप्रमाणे देहयष्टी बनवण्यासाठीदेखील रणबीरने बरीच मेहनत केली आहे.
संजय दत्तवरील हा चित्रपट ३० मार्च २०१८ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात परेश रावल सुनील दत्तच्या भूमिकेत तर मनीषा कोईराला नर्गिस यांची भूमिका साकारणार आहे. सोबतच सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि दिया मिर्झादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.