मुंबई : आतापर्यंत अनेक कलाकार अभिनय सोडून राजकारणाकडे वळले आहेत. त्यांच्या पाठोपाठ भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीने (Rani chatterjee)  काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिच्या या निर्णयानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. राणी चॅटर्जीने प्रियंका गांधींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो पाहिल्यानंतर आता राणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा अंदाज सर्वजण लावत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण राणी चॅटर्जीने राजकारणात प्रवेश केला नसून काँग्रेसच्या 'लड़की हूं लड़ सकती है' या मोहिमेत सामील झाली आहे. राणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियंका गांधी आणि मुंबई काँग्रेसचे युवा नेते सूरज सिंह ठाकूर दिसत आहेत. 


राणीचे काँग्रेससोबतचे संबंध काही लोकांना अजिबात आवडले नाहीत. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा शिकार व्हावे लागले.  तिच्या या निर्णयावर ट्रोलर्स  सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करत आहेत. 



तुझं करिअर आता संपणार... असं म्हणते राणीला ट्रोल केलं जात आहे. राणी ही भोजपुरी सिनेजगतातील यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे लाखो चाहते आहेत.


सोशल मीडियावर देखील तिच्या चाहच्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.