मुंबई : दीपिका पदुकोण Deepika Padukone सध्या 'छपाक' Chhapaak सिनेमाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर रणवीर सिंह मात्र '83' 83 Movie आणि 'जयेश भाई जोरदार' Jayesh Bhai Jordaar या सिनेमांच्या चित्रीकरणातून मोकळा झाल्याचं दिसत आहे. रविवारी मुंबईतील मॉलमध्ये रणवीर सिंह Ranveer Singh शॉपिंग करताना दिसला. रणवीर चक्क महिलांच्या बॅगेच्या Women Bag Shopping दुकानात खरेदी करताना दिसला. यावेळीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंहच्या 'सिम्बा' Simmba सिनेमाला 28 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. रणवीर सिंहने याचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून आगामी सिनेमाची घोषणा देखील केली आहे. रोहित शेट्टीच्या आगामी सूर्यवंशी (Sooryavanshi) सिनेमात रणवीर सिंह दिसणार असून यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगन असणार आहे. (... म्हणून दीपिकाने साकारली 'छपाक'मधील मालती) 



या सगळ्यातून वेळ काढत रणवीर सिंह बहिण रितिकासोबत खरेदी करायला गेला. या व्हिडिओ रणवीर कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसला. सफेद रंगाचा टीशर्ट आणि लाल रंगाची फेडारा पॅन्ट घातली होती. यावेळी आपल्या चाहत्यांना हात दाखवत रणवीर दिसत आहे. 



रणवीर सिंह बॅग खरेदी करताना रितिकाचं मत घेताना दिसत आहे. ही बॅग रणवीर छपाकच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या दीपिकाकरता घेतली असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. 



वर्क स्टेशनबद्दल बोलायचं झालं तर दीपिकाचा 'छपाक' सिनेमा नव्या वर्षात 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे. तर रणवीर सिंहचा 'जयेश भाई जोरदार'चा पहिला लूक 4 डिसेंबर 2019 रोजी लाँच झाला. रणवीर या नव्या अवतारासाठी खूप उत्सुक असल्याचं म्हटलं जातंय.