कोण म्हणतं Ranveer Singh आउटसाइडर? तो आहे `या` बॉलिवूड अभिनेत्रीचा नातू
Ranveer Singh : रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. पण अनेकांना अजून माहित नाही की तो एक आऊटसाइडर नाही तर त्याची आजी ही एक अभिनेत्री आहे. त्याच्या चुलत बहिणी देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. चला तर जाणून घेऊया रणवीर सिंगच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...
Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रणवीर सिंगचा आज 38 वा वाढदिवस आहे. रणवीरनं 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॅन्ड बाजा बारात या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रणवीरनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. रणवीरला आजही लोक एक आऊटसाइडर म्हणून ओळखतात. पण तुम्हाला माहित नसेल तर रणवीर हा 50 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री चांद बर्क यांचा नातू आहे. यासोबतच तो बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा भाचा देखील आहे.
चित्रपटसृष्टीविषयी बोलाचे झाले तर रणवीरला इथे त्याचं करिअर सेट करण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं. कधी त्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला तर कधी निर्मात्यानं त्याच्यावर श्वान सोडला. आज रणवीरच्या वाढदिवसानिमित्तानं जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी... रणवीरचे आजोबा सुंदर सिंह यांची बहीण सोनम कपूरची आजी आहे. त्यामुळे सोनम कपूर आणि रणवीर हे चुलत भाऊ-बहीण आहेत. रणवीरला त्याच्या आजीप्रमाणे लहाणपणापासूनच चित्रपटसृष्टीचा भाग होण्याची इच्छा होती. त्यामुळेच लहाणवयातच रणवीर शाळेतील नाटकांमध्ये भाग घेऊ लागला होता.
हेही वाचा : बॉक्स ऑफिसवर बाईपण आणि कमाई पण 'भारी' देवा! कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’लाही टाकलं मागे
रणवीरला लहाणवयातचं हीरो बनायचे होते पण एकवेळ अशी आली होती जेव्हा त्याला वाटले की तो अभिनेता होऊ शकत नाही. त्यामुळे त्यानं क्रिएटिव्ह राइटिंग करण्याचा निर्णय घेतला. रणवीरनं UK तं इंडियाना यूनिवर्सिटी ब्लूमिंगटनमधून BA चं शिक्षण पूर्ण केलं. त्याच दरम्यान, अभिनय शिकण्यासाठी त्यानं थिएटरमध्ये नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला.
कास्टिंग काऊचचा सामना
रणवीरला एक अशी व्यक्ती भेटली जी त्याला चित्रपटात कास्ट करेन असे म्हणाली, पण हे सांगून ते एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेली. त्या व्यक्तीनं रणवीरला काही अश्लील इशारे केले आणि विचारलं की तो हार्डवर्क करण्यावर विश्वास ठेवतो की स्मार्ट वर्क. जेव्हा रणवीर स्मार्ट वर्क करण्यावर माझा विश्वास आहे तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, डार्लिंग, स्मार्ट और सेक्सी बनो! त्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे हे रणवीरला कळताच तो तिथून पळून गेला.
बॅन्ड बाजा बारातमध्ये कशी मिळाली संधी...
आदित्य चोप्रानं बॅन्ड बाजा बारातसाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे हे रणवीरला कळताच तो ऑडिशनसाठी गेला. जेव्हा कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मानं आदित्य चोप्राला रणवीरचा फोटो दाखवला तेव्हा त्याला पाहून तो अॅक्टिव्ह नाही असं त्यांना वाटलं. त्यानंतर शानूनं त्याला एकदा त्याचं ऑडिशन घेऊन बघ असं सांगितल्यानं त्यासाठी आदित्य तयार झाले. त्यानंतर जेव्हा रणवीरनं ऑडिशन दिलं तेव्हा सगळे इम्प्रेस झाले.