बॉक्स ऑफिसवर बाईपण आणि कमाई पण 'भारी' देवा! कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’लाही टाकलं मागे

Baipan Bhari Deva IMDB Ratings : बाई पण भारी देवा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट अजूनही हाऊस फूल आहे. याशिवाय या चित्रपटानं कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. मराठी चित्रपटानं या बॉलिवूड चित्रपटाला कशात मागे टाकलं जाणून घेऊया...

दिक्षा पाटील | Updated: Jul 6, 2023, 01:19 PM IST
बॉक्स ऑफिसवर बाईपण आणि कमाई पण 'भारी' देवा! कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’लाही टाकलं मागे title=
(Photo Credit : Social Media)

Baipan Bhari Deva vs Satya Prem Ki Katha IMDB : मराठमोळा चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर सगळीकडे या चित्रपटाची चर्चा चांगलीच सुरु झाली. अजूनही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाचे अनेक शो हे हाऊसफूल झाले होत असून प्रेक्षक वेटिंगमध्ये आहेत. या मराठमोळ्या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यात आता या चित्रपटानं बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. 

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानं पहिल्या वीकएण्डला सर्वाधिक कमाई करणारा यंदाच्या वर्षीचा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 6.45 कोटींचा गल्ला केला. याशिवाय चित्रपटाला IMDB 8.8 रेटिंग मिळाले आहेत. बूक माय शोवर 9.3 रेटिंग मिळाले आहेत. तर गूगलवर 9.6 रेटिंग्स मिळाले आहे. अशात या चित्रपटानं कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ ला टक्कर कशात दिली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर ‘बाईपण भारी देवा’ नं ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला IMDB रेटिंग्समध्ये मागे टाकलं आहे. कार्तिक आर्यांच्या चित्रपटाला 7.5 रेटिंग्स आहेत. त्यामुळे हा मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांवर चांगलाच भारी पडल्याचे दिसत आहे.

Baipan Bhari Deva took over Satyaprem Ki Katha in imbd ratings

'बाईपण भारी देवा' ने पहिल्या तीन दिवसातच तब्बल 6.45 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटीची कमाई केली दुसऱ्या दिवशी 2.45 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी 3 कोटींची कमाई केली. एकूण या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच ६ कोटींची कमाई केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील 'मंगळागौर' हे गाणं चांगलच गाजत आहे. या गाण्याला युट्यूबवर 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील सर्व अभिनेत्री मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसत आहेत. आदिती द्रविडने लिहिलेलं हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रवींद्रने गायलं आहे. 

हेही वाचा : Salaar Teaser : प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचं 'केजीएफ 2' शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

दरम्यान, या चित्रपटाची पटकथा ही सहा बहिणींवर आहे. तर या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं असेल.