Rashmika Mandanna's reaction on Deepfake video : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी काल अटक केली. खरंतर रश्मिकानं दिल्ली पोलिसात या व्हिडीओ संदर्भात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी रश्मिकाचा डीपफेक व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं सगळ्यांचे आभार मानले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिकानं तिच्या X अकाऊंट म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रश्मिका म्हणाली की 'या प्रकरणातील व्यक्तीला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे खूप-खूप आभार. मी त्या सगळ्या लोकांचे मनापासून आभार व्यक्त करते. जे अशा कठीण काळात माझ्यासोबत उभे राहिली आणि त्यांनी माझी मदत केली. सगळ्या मुलं आणि मुलींसाठी लक्ष देऊन ऐका. जर तुमचा फोटो कोणत्याही प्रकारच्या फोटोत आणि व्हिडीओत वापरून तुमची प्रतिमा खराब करण्यासाठी वापरण्यात येत असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही या गोष्टीला लक्षात ठेवा की अशा गोष्टीत कोण तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला जी पाहिजे ती मदत करू शकेल.' 



दरम्यान, गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर रोजी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ खरंतर ब्रिटिश-इंडियन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जारा पटेलचा होता. मात्र, AI च्या मदतीनं याला डीपफेक करण्यात आलं आणि त्या महिलेच्या चेहऱ्याच्या जागी रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला. या व्हिडीओत रश्मिका मंदाना असल्याचं दाखवण्यात आलेल्या व्हिडीओत त्या महिलेनं डीपनेक स्पेगिटी परिधान करत ती लिफ्टमध्ये जाताना दिसली.  


फक्त रश्मिका नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीचे असे व्हिडीओ समोर आले होते. त्यात आलिया भट्ट, काजोल, नोरा फतेही या अभिनेत्री आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान, सगळ्याच सेलिब्रिटींनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं आणि लगेच यावर अॅक्शन घेण्याची मागणी केली. 


हेही वाचा : रश्मिका मंदाना डीपफेक वीडियो केस संदर्भात मोठी बातमी, पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात


रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'ॲनिमल' च्या यशानंतर रश्मिका आता 'पुष्पा 2: द रूल' दिसणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.