रश्मिका मंदाना डीपफेक वीडियो केस संदर्भात मोठी बातमी, पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात

Rashmika Mandanna Deepfake Case : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात आताची मोठी अपडेट, दिल्ली पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात

दिक्षा पाटील | Updated: Jan 20, 2024, 05:05 PM IST
रश्मिका मंदाना डीपफेक वीडियो केस संदर्भात मोठी बातमी, पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात title=
(Photo Credit : Social Media)

Rashmika Mandanna Deepfake Case : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात दिल्ली पोलिस यशस्वी ठरले आहेत. पोलिसांनी स्पेशल सेल प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तेव्हा पासून ते आरोपीच्या शोधात होते. असं म्हटलं जातं की अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यात सहभाग होता. तर याच व्यक्तीनं रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला होता. 

या प्रकरणात ही माहिती समोर आली होती की दिल्ली पोलिसांनी चार संशयीत लोकांना अटक केलं होतं. हे ते लोक आहेत ज्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला होता. खरंतर, मुख्य आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता. एएनआयच्या वृत्तानुसार, दोन महिन्यांचा तपास आणि डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले आहेत. त्यासाठी पोलिसांच्या विशेष कक्षाने आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून हा व्हिडीओ सर्वप्रथम कोठून तयार केला आणि तो कुठून अपलोड केला, याचा शोध घेतला.

दरम्यान, गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर रोजी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ खरंतर ब्रिटिश-इंडियन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जारा पटेलचा होता. मात्र, AI च्या मदतीनं याला डीपफेक करण्यात आलं आणि त्या महिलेच्या चेहऱ्याच्या जागी रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला. या व्हिडीओत रश्मिका मंदाना असल्याचं दाखवण्यात आलेल्या व्हिडीओत त्या महिलेनं डीपनेक स्पेगिटी परिधान करत ती लिफ्टमध्ये जाताना दिसली.  

हेही वाचा : Sania-Shoaib Divorce: सानियानं शोएबला दिला घटस्फोट! टेनिसपटुच्या वडिलांनी केला खुलासा

या प्रकरणात दिल्लीतील महिला आयोगानं पोलिसांना नोटिस बजावली होती. त्यानंतर इंटेलिजेंस फ्यूजन अॅन्ड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) यूनिटच्या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली. रश्मिकानं देखील दिल्ली पोलिसात याची तक्रार दाखल केली होती. तर या प्रकरणात तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली होती. त्यात ती म्हणाली होती की "मला खूप वाईट वाटतंय. खरं, सांगू तर AI फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी खूप वाईट आहे. जे लोक या टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करत आहेत. त्यांच्यामुळे सगळ्यांना धोका निर्माण होतोय."