दिग्दर्शक : विकास बहल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य भूमिका : हृतिक रोशन, पंकज त्रिपाठी, मृणाल ठाकूर


'आज राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हक्कदार होगा...' या संवाद जितका प्रभावी वाटतोय, तितक्याच प्रभावीपणे हृतिकने तो रुपेरी पडद्यावर साकारला आहे. बुद्धीमत्तेच्या जोरावर  केब्रिज विद्यापिठात प्रवेश मिळूनही, केवळ गरिबी आड येऊन तेथे प्रवेश घेऊ न शकणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या, सामान्य व्यक्तीची, असामान्य संघर्षगाथा समाजातील गंभीर वास्तवाची जाणीव करुन देते. 


आनंद यांना वडिलांचं निधन, गरिब परिस्थिती या खालाकीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचदरम्यान आनंद यांना साथ मिळते ती लल्लन सिंह या मित्राची. लल्लन सिंहची भूमिका आदित्य श्रीवास्तव यांनी साकारली आहे. लल्लन आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून आनंद यांना सामील करुन घेतो. 



मात्र या दरम्यान त्यांना या गोष्टीची जाणीव होते की, अशी अनेक मुलं आहेत ज्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागतो...आणि याच जाणीवेतून आनंद कुमार यांनी आपलं ऐशोआरामाचं करियर सोडून, आपल्या प्रेमाची कुर्बानी देत अशा ३० विद्यार्थ्यांना आयआयटीचं शिक्षण दिलं जे अतिशय गरिब होते. 



हृतिकला याआधी अशाप्रकारची व्यक्तिरेखा साकारताना पाहिलं नाही. हृतिकने आनंद कुमार या व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. मात्र चित्रपटात काही ठिकाणी हृतिक बिहारी भाषेचं उच्चारण तितकंच चोखपणे करु शकला नसल्याचं जाणवतं. चित्रपटाचा पहिला भाग अतिशय भावतो...मात्र दुसऱ्या भागात चित्रपट काहीसा स्लो वाटतो. चित्रपटात मृणाल ठाकूरने साकारलेली भूमिका फारशी छाप पाडत नाही.



चित्रपटात आनंद कुमार यांच्या खासगी आयुष्यातील अनेक छोट्या-छोट्या घटनांवर लक्षकेंद्रित करण्यात आलं आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक बारकावे चोखपणे दाखवण्यात आले आहेत. २ तास ४२ मिनिटं असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल याचं कौतुक करावं लागेल. आनंद कुमार यांच्या जीवनातील कटू वास्तविकता अतिशय उत्कृष्टरित्या रुपेरी पडद्यावर मांडली आहे. त्यामुळे सत्य घटनेवर आधारित 'सुपर ३०' ची प्रेरणादायी गोष्ट एकदा पाहायला नक्कीच हरकत नाही.