Richa Chadha च्या गलवान ट्विटवर अक्षय कुमार भडकला, म्हणाला...
रिचा चढ्ढाच सैन्याबाबत अपमानजनक ट्विट, अक्षय कुमारने रिट्विट करत सुनावलं
Richa Chadha : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने (Richa Chadha) गलवान ट्विटवर माफी मागून देखील वाद शमला नाही आहे. कारण आता या वादात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने (Akshay Kumar) उडी घेतलीय. अक्षय कुमारने आता रिचा चढ्ढाचे (Richa Chaddha galwan controversy) ट्विट रिट्विट करत तिला तिखट शब्दात सुनावले आहे. तसेच आपल्या सैन्याचे उपकार आपण कधीही विसरता कामा नये, असा सल्ला देखील दिला आहे.
हे ही वाचा : अभिनेत्री रिचा चढ्ढाचा माफिनामा, 'त्या' ट्विटवर दिलं स्पष्टीकरण
काय प्रकरण?
रिचाने (Richa Chadha) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे आदेश लागू करण्याचे विधान केले होते. यावर रिचानं उपेंद्र द्विवेदी यांच्या व्हिडिओवर ‘गलवान हाय कह रहा है’असे ट्विट केले होते. या तिच्या (Galwan) गलवानच्या ट्विटमुळे रिचा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. रिचानं तिच्या पोस्टमध्ये तिनं भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर होत होता. तसेच तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल देखील करण्यात आले होते.
भाजपा आक्रमक
रिचाने (Richa Chaddha galwan controversy) गलवान केलेल्या या ट्विटवर भाजप देखील आक्रमक झाली होती. भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी रिचावर निशाणा साधत, तिचे हे ट्वीट लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. अशाप्रकारे आपल्या सैन्याचा अपमान करणं योग्य नाही, त्यामुळे रिचानं ते ट्विट लवकरात लवकर डिलीट करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भाजपने ट्विटवर आक्षेप घेतल्यानंतर व ट्रोलिंगनंतर अखेर रिचा चढ्ढाने माफी मागितली आहे. ट्विटवरील वादानंतर रिचा चढ्ढाला माफी मागावी लागली आणि आपल्या कुटुंबाच्या लष्कराशी असलेल्या संबंधाचा दाखला द्यावा लागला आहे. यासोबतच तिने गलवानवरील ट्विटही डिलीट केले होते.
वादात अक्षयची उडी
रिचा चढ्ढा (Richa Chaddha galwan controversy) ट्विट वादावर अक्षय कुमारने (Akshay Kumar) उडी घेतलीय.अक्षय कुमारने रिचाचे ट्विट रिट्विट करत लिहिले,'हे पाहून वाईट वाटते. आपल्या सैन्याबद्दलचे उपकार आपण कधीही विसरता कामा नये. ते असतील तर आज आपण आहोत. त्याने या ट्विटमध्ये रिचा चढ्ढावर टीका केली आहे. तसेच भारतीय लष्कराचे कौतुक देखील केले आहे. अक्षय कुमारचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रिचाच्या (Richa Chaddha) या माफिनाम्यानंतर देखील हा वाद वाढताना दिसत आहे.