मुंबई : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. देशात दिवाळीचा आनंद प्रत्येक जण लुटत आहे. बॉलिवूडकर देखील एकमेकांच्या घरी जावून दिवाळी साजरी करत आहेत. पण एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर फोटोग्राफर्स मंडळींवर चांगलेच भडकले. फोटोग्राफर्सवर भडकताना ऋषी कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. 



व्हायरल व्हिडिओमध्ये फोटोग्राफर्स ऋषी कपूर यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा होत असलेला गोंधळ त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे ते फोटोग्राफर्स मंडळींना गोंधळ कमी करण्यासाठी सांगत होते. 


'आपण दिवाळी शांततेत साजरी करायला हवी. फोटो काढा, जे करायचे ते करा पण गोंधळ करू नका.' असे ऋषी कपूर यांनी फोटोग्राफर्स मंडळींना सांगितले. इकडे बघा, तिकडे बघा कृपया असं करू नका असं आवाहन त्यांनी जमलेल्यांना केले. 


काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर आपल्या गंभीर आजारावर मात करत आपल्या मायदेशी परतले आहेत. यावेळेस ते पत्नी नितू सिंगसोबत एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये पोहोचले होते.