Riteish Deshmukh and Genelia Deshmukh: जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांचा 'वेड' हा मराठी चित्रपट (Ved Marathi Movie) 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मराठी तसेच जागतिक प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 'वेड' या चित्रपटानं आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कमाई केली आहे. सध्या वेड या चित्रपटामुळे रितेश देशमुख आणि जेनेलियाचीच (Genelia  Deshmukh) हवा आहे. वेड या चित्रपटाचे प्रमोशनही मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते त्यानिमित्ताने रितेश आणि जेनेलियानं माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी जेनेलिया आणि रितेशनं आपल्या नात्याबद्दलच्याही अनेक गोष्टी उलगडल्या होत्या. 2003 साली रितेश आणि जेनेलियानं पहिल्यांदा एकत्र चित्रपटातून काम केले होते. त्यामुळे एकमेकांच्या सहवासाला त्यांना या इंडस्ट्रीत 20 वर्षे पुर्ण झाली आहेत. (riteish deshmukh and genelia deshmukh share their relationship secrets in kapil sharma show)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, कपिल शर्माच्या शोमध्ये रितेश आणि जेनेलियानं आपल्या नात्याविषयी अनेक खुलासे केले होते. तेव्हा कपिलनं त्यांना एक रंजक प्रश्न विचारला होता. कपिललं त्यांना असं विचारलं होतं की, तुमच्यात कधी भांडणं होतात का, कधी कोणी कुणाला सॉरी म्हणतं का तर यावर त्या दोघांनी आपल्या नात्याविषयीचं सिक्रेट (Relationship Secret) सांगितले. 


या प्रश्नाला उत्तर देताना जेनेलिया देशमुख म्हणाली की, मी रितेशशी अनेकदा भांडणं असते आणि मग तो मात्र त्यावर काही रिएक्ट करत नाही तर त्यावर फक्त ऐकून घेतो आणि निघून जातो. सकाळी उठल्यावर मात्र येऊन गुड माॉर्निंग म्हणतो. त्यावर रितेश म्हणाला की, आमच्यात जेव्हा भांडणं होतात तेव्हा मीच पुढाकार घेऊन सॉरी म्हणतो, मीच स्वत:हून बोलण्याचा प्रयत्न करतो. कालच भांडणं झाले ते झाले आता नवीन दिवस सुरू होतो त्यानुसार नव्यानं सुरूवात करायला पाहिजे. आता माझं नावं रितेश देशमुख नाही सॉरी देशमुख (Ritesh Deshmukh in Kaplil Sharma Show) ठेवायला हवं, असं गमतीनं तो एका मुलाखतीत म्हणाला होता. 


हेही वाचा - फोटोग्राफर्सना पाहताच Riteish-Genelia मुलांसह करतात नमस्कार! मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी म्हणाले...


रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचे लग्न 2012 साली झाली. 2003 नंतर भेटल्यानंतर त्यांच्यात एकमेकांमध्ये मैत्री वाढू लागली मग त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मग त्यांनी लग्न केले. त्यांनी राहिल आणि रियान नावाची दोन मुलं आहेत. रितेश हा तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Former Chief Minister Riteish Deshmukh) यांचा मुलगा होता.


हेही वाचा - Health : महिलांसाठी महत्त्वाची बातमी; वयाच्या 30 वर्षानंतर करताय Pregnancy चा विचार? मग...


त्यामुळे रितेशला खूप एटिट्यूड असेल तर सुरूवातीला जेनेलियाला वाटलं होतं परंतु तसे नसून रितेशनं आपल्याशी खूप गोड मैत्री (Friendship) केली असं ती म्हणाली. सध्या रितेश देशमुख आणि जेनेलियाचा 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.