Health : महिलांसाठी महत्त्वाची बातमी; वयाच्या 30 वर्षानंतर करताय Pregnancy चा विचार? मग...

Healthy Pregnancy After 30: लग्नानंतर आपण ठराविक काळानंतर प्रेग्नंन्सी प्लॅन (Pregnancy Planning) करतो. करिअर आणि मॅरिज लाईफ बॅलन्स करता करता आपल्यालाही आपल्या प्रेग्नंन्सीचं योग्य ते नियोजन करावे लागते. 

Updated: Jan 15, 2023, 03:07 PM IST
Health : महिलांसाठी महत्त्वाची बातमी; वयाच्या 30 वर्षानंतर करताय Pregnancy चा विचार? मग... title=

Healthy Pregnancy After 30: लग्नानंतर आपण ठराविक काळानंतर प्रेग्नंन्सी प्लॅन (Pregnancy Planning) करतो. करिअर आणि मॅरिज लाईफ बॅलन्स करता करता आपल्यालाही आपल्या प्रेग्नंन्सीचं योग्य ते नियोजन करावे लागते. वर्क लाईफ बॅलन्स करताना प्रेग्नंन्ट स्त्रियांना (Work Life Balance) आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते. आई बनण्याची इच्छा प्रत्येक स्त्रिला असते. परंतु अनेक स्त्रियांना करिअर आणि इतर काही कारणांमुळे खूप उशिरा प्रेग्नंन्सीचा विचार करावा (Career and Pregnancy) लागतो. त्यासाठीचं मग नियोजन तेव्हा नीट त्या स्त्रियांना करता येत नाही. आपलं वय ज्याप्रमाणे वाढतं जातं त्याप्रमाणे आपली प्रजनन क्षमता (Fertility) कमी होऊ लागते. काही स्त्रिया या वयाच्या तिशीनंतर प्रेग्नंन्सी प्लॅन करतात परंतु हे मूल होण्याच्या दृष्टीनं योग्य नसतं. (what are the useful tips to have healthy pregnancy after age of 30 females health tips)

आरोग्या तज्ञांच्या मते, 30 नंतर काही महिलांना प्रेग्नंन्सीचा विचार योग्य वाटतो. तेव्हा त्यांना आपल्या करिअरचा विचार आधी आणि मग मूल जन्माला घालण्याचा विचार पटतो. काही स्त्रिया या 30 च्या आधीही योग्य तऱ्हेने प्रेग्नंन्सीचा विचार करतात परंतु काही तज्ञांच्या मते, 30 नंतरही काही उपायांनूसार, महिलां या वयात आपली प्रजनन क्षमता वाढवू शकतात. तेव्हा जाणून घेऊया की उपाय कोणते आणि ते कसे अवलंबवले गेले पाहिजेत. 

वाढत्या वयानूसार, महिलांना आपल्या गर्भधारणेचे योग्य प्रकारे नियोजन करावे लागते. 27 ते 35 या वयापर्यंत मुल होणं महत्त्वाचे ठरते. परंतु जस जसे वय वाढतं जाते तसतसे फर्टिलिटीही क्षमताही कमी होत जाते. आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांची जीवनशैली ही खूप बदलते आहे. त्याचसोबत घरगुती काम, कुटुंब आणि घर संसार, करिअर या सगळ्यांनाच आजच्या काळातील स्त्रियांना मॅनेज करावे लागते. अशा परिस्थिती महिलांना आपल्याकडे लक्ष द्यायलाही जमत नाही. तेव्हा प्रेग्नंन्सीचा विचार करणंही या महिलासांठी अवघड होऊन जाते. त्यातून सततच्या धकाधकीच्या जीवनामुळेही महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. 

1. सर्वप्रथम अशावेळी महिलांनी ताण घेणे टाळावे. जास्त ताण घेतल्यानं (Stress in Pregnancy) त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या ओव्हुलेशनवरही त्याचा परिणाम होतो म्हणजे थोडक्यात त्याचा तुमच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन आणि योगा करा. 

2. गर्भधारणेच्या काळात दारू, मद्यपान किंवा मांसाहार टाळावा. तेव्हा अशा काळात अल्कोहोलपासून (Alcohol) दूर राहा. अन्यथा तुम्हाला गर्भधारणेच्या वेळी खूप त्रास सहन करावा लागू शकतो. मद्यपानासोबत चहा - कॉफीचेही सेवन टाळा. कारण यातील कॉफिनमुळे तुमच्या इस्ट्रोजनवर परिणाम होतो. 

3. काहीवेळी दररोज सेक्स (Sex) करण्याचाही सल्ला दिला जातो. त्यामुळे गर्भधारणा लवकर होऊ शकते.

हेही वाचा - Makar Sankranti 2023: Top 5 बॉलिवूड गाण्यांनी जागवल्या मकरसंक्रांतीच्या गोड आठवणी, तुमच्याकडे आहे का 'ही' Playlist?

4. जर तुम्ही प्रेग्नंन्सीचा गंभीरतेनं विचार करत असाल तर तुमच्या खाण्यापिण्याचा योग्य तो विचार करा. जंक फूड किंवा बाहेरचे तेलकट, तूपकट पदार्थ अजिबातच खाऊ नये. त्याचसोबत तुमच्या आहारात पोषक घटकांचा वापर करा जेणेकरून तुमच्या होणाऱ्या बाळाला त्याचा त्रास होणार नाही. या काळात फळं, भाज्या तर खाल्ल्या गेल्या पाहिजेतच पण त्याचसोबत कार्ब्स, गुड फॅट्स (Carbs) आणि प्रथिनांचाही तुमच्या आहारात समावेश होण गरजेचे आहे. गर्भधारणा होण्यासाठी झिंकचा आहारात समावेश करा.