मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रितेशचे लाखो चाहते असून तो त्याच्या कॉमेडी आणि क्यूट अंदाजासाठी ओळखला जातो. रितेश फक्त चित्रपटात चाहत्यांचे मनोरंजन करत नाही तर खऱ्या आयुष्यातही त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. रितेशला पापाराझी नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट करतात. सध्या रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश देशमुखचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशला पापाराझींनी स्पॉट केल्याचे पाहायला मिळते. यावेळी पापाराझी रितेशला फोटो क्लिक करण्यासाठी पोज देण्याची मागणी करतात. यादरम्यान, रितेश गंमतीत पापाराझींकडे पोज देण्यासाठी मराठीत बोलतो की सगळ्यांनी मला चार- पाच रुपये द्या. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. एवढंच काय तर हा व्हिडीओ पाहून चाहते त्यांच हसू आवरत नाही आहेत. (Riteish Deshmukh Viral Video)


हेही वाचा : बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण


रितेश देशमुखचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, रितेश हा बऱ्याचवेळा त्याची पत्नी जिनिलियासोबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्या दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्या दोघांची जोडी ही सोशल मीडियावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक घ्या. (riteish deshmukh demanding five five rupees for posing in front of papprazi viral video) 


रितेश देशमुखचा व्हिडीओ पाहा


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जिनिलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचा स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. 2012 मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.