बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण

ऋषभनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. 

Updated: Nov 6, 2022, 10:35 AM IST
बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कंतारा' (Kantara) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एवढंच काय तर हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. फक्त 16 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट आज इतका यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात प्रादेशिक लोककथा आणि चालीरीती दाखवण्यात आल्या आहेत. हा एक कन्नड सिनेमा असून यंदाच्या वर्षी आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये दुसरा आहे. खरंतर ऋषभनं फक्त कन्नड लोकांसाठी कांतारा हा चित्रपट बनवला होता. पण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यानं हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करण्यात आला. आता दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षक पहिली पसंती देत असताना बॉलिवूड चित्रपट आता काही बाजी मारताना दिसत नाही. यावर आता ऋषभनं त्याच मत मांडलं आहे. 

ऋषभ शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'कांतारा'वर बोलत बॉलिवूडमध्ये कुठे चुकत आहे हे सांगितलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे ते यश मिळवण्यात अपयशी ठरवत आहेत. कांताराच्या यशाचे श्रेय ऋषभनं त्याच्या पॅकेजिंगला दिलं आहे. 

काय म्हणाला ऋषभ शेट्टी

ऋषभ शेट्टीने 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तुम्ही चित्रपटाच्या कहानीवर जितकं काम कराल तितकाच चित्रपट चांगला होतो आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. याचा अर्थ तुम्हाला ज्या गोष्टीची जास्त माहिती आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे तुम्ही ते चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकाल. मात्र, आजकाल बॉलिवूड चित्रपट निर्माते आजकाल ही गोष्ट विसरत आहेत. तशी कहाणी आणि पडद्यावर दाखवण्याची त्यांची शैली ही अप्रतिम आहे. 

यंदाच्या वर्षी 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप वाईट गेलं आहे. यावर्षी प्रदर्शित झालेले बहुतेक बॉलिवूड चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. त्यात 'गंगुबाई काठियावाडी', 'द कश्मीर फाइल्स', 'भूल भुलैया 2' आणि 'ब्रह्मास्त्र' व्यतिरिक्त इतर कोणत्याही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. दरम्यान, 'लाल सिंह चड्ढा' ते 'रक्षाबंधन', 'राम सेतू', 'गुडबाय' आणि 'थँक गॉड' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशस्वी ठरले. 
 
ऋषभनं बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना आता काय करण्याची आवश्यकता आहे याचा सल्ला दिला आहे. ऋषभ शेट्टी म्हणाला की, वेस्टर्न कॉन्टेट हा प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळत आहेत. पण अशी कहानी मिळत नाहीजी पाहून प्रेक्षक रिलेट करू शकतील. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे ओटीटी विषयी बोलताना ऋषभ म्हणाला, ओटीटीवर पाश्चात्य देशांचा संपूर्ण कॉन्टेंट मिळत आहे. एक गोष्ट जी मिळत नाही ती म्हणजे माझ्या गावाची गोष्ट. ती आपल्या प्रदेशातील कहानी आहे. यात आपले मुल्य आहेत आणि ते आपल्याला इतर ठिकाणी मिळणार नाही. तुम्ही गोष्ट सांगणारे आहात तुम्हाला तुमच्याच क्षेत्रातील अनेक गोष्टी मिळू शकतात. त्याच गोष्ट प्रेक्षकांसमोर आणणं हे महत्त्वाचं आहे.(Kantara Star Rishab Shetty Reveals Where Bollywood Is Going Wrong Says It Is Losing Local Touch Due To Western Influence and Should Relate to Audience)  

दरम्यान, 'कांतारा' हा चित्रपट 16 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आली होती. या चित्रपटानं 33 वर्ल्डवाइड 309 कोटीची कमाई केली. प्रादेशिक कथेवर आधारीत कांतारा चित्रपट कन्नडमध्ये 30 सप्टेंबक रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये 14 ऑक्टोबरला प्रदर्शित झाले. 'कांतारा' नं सगळ्या भाषांमध्ये 33 दिवसात देशांमध्ये 241.59 कोटी रुपयांची कमाई केली. तर 19 दिवसात 'कांतारा' च्या हिंदी डब चित्रपटानं 47.55 कोटी रूपयांची कमाई केली.