मुंबई : सोशल मीडियाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचा वापर न करणारे दुर्मिळच म्हणावे लागतील. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. मग त्यावरुन नेटकऱ्यांमध्ये रंगते जोरदार चर्चा. असाच एक फोटो ट्विटरवर सध्या व्हायरल झालाय.


या फोटोला सोशल मीडियावर मिळत असलेला प्रतिसाद पाहता अभिनेता रितेश देशमुखलाही हा फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नाही. हा फोटो रितेशने ट्विट करताना त्याच्या टॅलेंटचेही कौतुक केले. असे टॅलेंट फार कमी लोकांमध्ये दिसते असं तो म्हणालाय.


या व्यक्तीच्या दुसऱ्या पोझमधील फोटोही सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय ठरतायत. दरम्यान, ही व्यक्ती कोण आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये.