Riteish and Genelia Deskmukh: रितेश आणि जेनिलिया देशमुख आपल्या मुलांसोबत अनेक स्पॉट (Ritesh and Genelia) होत असतात. तेव्हा कायमच ते छायाचित्रकारांना पाहून नमस्कार करतात. रितेश आणि जेनेलिया आणि त्यांची दोन मुलं एकत्रितपणे त्यांना नमस्कार करतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे ज्यात जेनेलिया-रितेशसोबत दोन्ही मुलं, रिहान आणि राहयल (Rahyl and Rihaan) पापाराझींकडे पाहून आदरानं नमस्कार करताना दिसले. त्यामुळे सध्या या व्हिडीओची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडीओखाली नेटकरी खूप पॉझिटिव्ह कमेंट्स करताना दिसत आहेत. मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत म्हणून नेटकरी रितेश आणि जेनेलियाचे कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी (Netizens Praises) चर्चेचा विषय ठरला आहे. (Riteish Genelia deskmukh kids folds their hands to show respect to photographers with namasakar video goes viral netizens praises)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यंतरी असेच काही व्हिडीओही व्हायरल झाले होते ज्यात रितेश आणि जेनेलिया यांच्या मुलांनी फोटोग्राफर्सना नमस्कार केला होता. तेव्हा त्या व्हिडीओजची विशेष चर्चा झाली होती. रितेश आणि जेनेलिया यांच्या मुलाचा, रियानचा सातवा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता तेव्हा अनेक मोठ्या सेलिब्रेटींनी (Rihaan Birthday) हजेरी लावली होती. एव्हानाही फोटोग्राफर्सना हात जोडून त्यांना नमस्कार केला होता. यावेळीही त्यांचे नेटकऱ्यांकडून खूप कौतुक झाले होते. 


रितेशला यावरतीच जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा रितेशनं सांगितले होते की, प्रत्येकाचा आदर करायला आम्ही आमच्या मुलांना शिकवतो आहोत, असे प्राजंळ उत्तर त्यानं दिले होते. अनेकदा यावरून ते ट्रोलही (Trolled) झाले आहेत. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवरही काहींनी टीका केली आहे. तुम्ही भारतीय संस्कृती पाळता, पण कपडे वेस्टर्न घालता का?, तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलं आहे की, मुलांचे केस लांब हे कुठे चालत? परंतु आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन (Indian Culture) आणि मुलांना योग्य तऱ्हेनं समाजात वागण्याची शिकवण ही रितेश आणि जेनेलियाकडून शिकावी (Parenting) असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 


पाहा व्हिडीओ - (courtesy - Pinkvilla)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रितेश आणि जेनेलियाचा 'वेड' (Ved) हा पहिला मराठी चित्रपट 30 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून या चित्रपटानं खूप मोठी कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं कोटींच्या घरात कमाई केली आहे. मराठीमोळ्या रितेश देशमुखचा हा पहिलाच चित्रपट होता, ज्यात त्यानं अभिनयासोबतच दिग्दर्शकाची भुमिका निभावली आहे.


हेही वाचा - Shaktikanta Das: ''क्रिप्टोकरन्सी हा केवळ जूगार, त्यावर बंदी आणली पाहिजे'' RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे वक्तव्य चर्चेत


या चित्रपटात रितेश आणि जेनेलियासह मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी महत्त्वाची भुमिका केली आहे. या चित्रपटाला अजय-अतूल यांनी संगीत दिलं असून चित्रपटातील वेड या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचललं आहे.