Shaktikant Das: जगभरात क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) क्रेझ वाढते आहे. त्याची आवड भारतातही असल्याचे दिसून येते आहे. मागच्या बजेटमध्येही डिजिटल करन्सीचे (Digital Currency) महत्त्व अधोरेखित केले होते. या करन्सीची लोकप्रियताही देशात वाढू लागली असताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das on Cryptocurrency) यांनी क्रिप्टोकरन्सी जुगार असल्याचे म्हणले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज शुक्रवारी क्रिप्टोकरन्सीवर संपुर्ण बंदी आणण्याच्या आवाहनाचा पुनरूच्चार केला. शक्तिकांत दास यांनी पुणे सांगितले की, ज्यांना असं वाटतं की या करन्सीला किंमत आहे तर त पुर्णपणे चुकीचे आहे. क्रिप्टोकरन्सी ही जुगार (Gambling) आहे त्याशिवया दुसरे काहीही नाही. या करन्सीचं कथित मूल्य म्हणजे चुकीचा विश्वास आणि फसवणूक आहे. (rbi governor Shaktikanta Das speaks on cryptocurrency as gambling know more what he said)
शुक्रवारी एका मोठ्या वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी क्रिप्टोवर संपुर्ण बंदी घाला, असं वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही मालमत्ता किंवा आर्थिक उत्पादनाचं समर्थन करण्यासाठी म्हणजे त्याची किंमत ठरवण्यासाठी त्या मालमत्तेचे किंवा उत्पादनाचे मुलभूत (No Value to cryptocurrency) असे मुल्य असते. परंतु क्रिप्टोकरन्सी त्यात मोडत नाही. या क्रिप्टो करन्सीला कुठलंही मूळ मुल्य नाही, असे ते म्हणाले. क्रिप्टोकरन्सी हे फक्त खोट्या विश्वासावर आहे.
या क्रिप्टोकरन्सीची मार्केट प्राईस (Market Price) वाढताना दिसते तेव्हा ते असं दाखवलं जातं की (Make-Believe) या जगात याला खूप मोठी किंमत आहे. परंतु ते तसं नाही. त्याऊलट जी गोष्ट याच विचारवर आधारित असेल किंवा त्या गोष्टीचं मुल्य फक्त याचं गोष्टीवर अवलंबून असले तर 100 टक्के खोटं आहे. हे जूगार आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पायलट मोडवरती रिझर्व्ह बॅंकेनं ई-रूपी (E-Rupee) आणलं आहे.
क्रिप्टोकरन्सी ही कधी ना कधी तर कोसळणार, एफटीएक्स (FTX) ही कंपनी ज्याप्रकारे उद्धवस्त झाली आहे त्यानंतर मला या प्रकरणात अजून काही सांगायची गरज नाही, या करन्सीचा धोका टाळण्यासाठी बॅंकाना पुढाकार घेणं गरजेचे आहे. कारण सध्या डेटा प्रायव्हसी आणि सिक्यूरिटीचा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे अशावेळी बॅंका या मोठ्या तंत्रज्ञानाचा आधार घेतात. परंतु यात बॅंकेनी योग्य काळजी घेतली पाहिजे. बॅंकांनी आपले निर्णय स्वत:हून घेतले पाहिजेत आणि त्याचबरोबर मोठ्या तंत्रज्ञानाला बळी पडू नये.
हेही वाचा - Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?
आपल्या देशात जुगार खेळण्यास परवानगी नाही. जर तुम्हाला या जुगाराला परवानगी द्यायची नसेल तर याला जुगार समजा आणि जुगाराचे नियम निर्धारित करा परंतु क्रिप्टो एक फायनॅन्शिअल प्रोडक्ट (Financial Product) नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.