Devoleena Bhattacharjee Pregnancy Rumours: झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिला गुप्त पद्धतीनं लग्न का केलं असा प्रश्न विचारत त्याच कारण प्रेग्नेंसी असू शकत असे म्हटले आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सोशल मीडियावर सतत येत आहेत. आता अभिनेत्रीने या रिपोर्ट्सवर मौन सोडले आहे आणि या रिपोर्ट्सवर ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रोलर्सनं देवोलीना भट्टाचार्जीनं सिक्रेट लग्न केल्यानं या सगळ्याचा संबंध तिच्या प्रेग्नंसीशी जोडण्यात येत आहे. प्रेग्नंसीमुळे तिनं ट्रेनरनं घाईघाईत आणि गुपचूप लग्न केले. आता देवोलीनानं या बातमींवर मौन सोडले आहे. 'मला कोणालाही काहीही समजावून सांगण्याची गरज नाही. पण होय, असं काही लोक आहेत ज्यांना वाटतं की मी प्रेग्नंट आहे आणि म्हणून मी घाईघाईत लग्न केलं', असं देवोलीना म्हणाली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे  देवोलिना म्हणाली, 'मला धक्का बसला आहे आणि अशा वाईट कमेंट करणाऱ्या लोकांबद्दल मला वाईट वाटतं. हे खूप चुकीचं आहे. असे लोक कोणावरही अत्याचार करण्याची संधी सोडत नाही. पण नंतर जेव्हा मी कमेंट वाचल्या तेव्हा मी हसले आणि त्यांना माफ केलं. मी सध्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे. पण मी कामासाठी तयार आहे.' 


हेही वाचा : आयुष्य संपवण्याआधी Tunisha Sharma नं शेअर केलेली शेवटची पोस्ट Viral


देवोलीनानं आत्तापर्यंत कोणाला तिच्या रिलेशनशिपविषयी कळू दिले नव्हते. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की साथ निभाना साथिया या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, जेव्हा देवोलीनानं लग्नानंतर तिचे शहनवाजसोबत (shahnawaz sheikh) फोटो शेअर केले होते. तर सगळ्यांना आश्चर्य झाले. रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019  शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.


दरम्यान, या आधी देवोलीना आणि विशालनं त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र, त्यावेळी त्यांचे लग्न झाले नव्हते तर त्यांचे एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार होतं. देवोलीना आणि विशालमध्ये असलेली जवळीकता पाहता ते दोघे मित्र नाहीत असे नेहमी अनेकांनी म्हटलं होते. इतकंच नाही तर ते दोघं रिलेशनशिपमध्ये असून ते फक्त जगापासून या विषयी लपवत आहेत असे नेटकऱ्यांना वाटायचे.