मुंबई : आपल्या सगळ्यांच्या लाडक्या 'सा रे ग म प' या स्पर्धेला यंदा २५ वर्षं पूर्ण झाली. लॉकडाऊनच्या काळात 'एक देश एक राग' हा खास आणि दिमाखदार सोहळा अनुभवण्याची संध. जर तुम्ही गमावली असेल, तर 'झी युवा' पुन्हा एकदा हा उत्कृष्ट सोहळा तुमच्यासाठी घेऊन येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीत क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि गायक मंडळींच्या गप्पांची आणि गाण्यांची उत्तम मैफिल अनुभवता येईल. 'झी युवा' वाहिनीवर ३१ मे  या दिवशी संध्याकाळी ७ वाजता हा सोहळा बघता येणार आहे. या २५ वर्षांच्या प्रवासात वेगवेगळी पर्व आपण अनुभवली आहेत. खास सेलिब्रिटींकरिता झालेल्या पर्वातील मंडळी आपापल्या घरून या सोहळ्यात सहभागी झाली होती. सेलिब्रिटी पर्वात सहभागी झालेल्या किशोरी शहाणे, प्रशांत दामले, प्रसाद ओक, प्रिया बापट, अमृता सुभाष, गिरीजा ओक या कलाकार मंडळींनी उत्तमोत्तम गाणी सादर केली.



यांच्या बरोबरीने सूत्रसंचालक अभिजित खांडकेकर, सेलिब्रिटी पर्वातील अंतिम फेरी गाठणारा सुमीत राघवन आणि पुष्कर श्रोत्री सुद्धा या सत्रात सहभागी झाले होते. त्याच्या या कलाकार मित्रांसह पुष्करने दमशराजचा खेळ खेळला. 'सा रे ग म प'च्या भल्या मोठ्या कुटुंबातील हे सदस्य एका अनोख्या मंचावर एकत्र जमले होते. त्यांची धमाल आणि त्याच बरोबरीने 'सा रे ग म प'च्या इतर अनेकांची उपस्थिती असलेला हा जबरदस्त सोहळा रविवार ३१ मे  रोजी 'झी युवा'वर पाहायला विसरू नका, संध्याकाळी ७ वाजता !