Sai Lokur Video: सेलिब्रेटींचे व्हिडीओ हे कायमच व्हायरल होताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर रील्सचं प्रमाण सध्या वाढू लागलं आहे त्यामुळे सेलिब्रेटींचे असे हटके आणि आकर्षक रिल्स हे कायमच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगताना दिसते. आता अशाच एका सेलिब्रेटी अभिनेत्रीची चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं परदेशातून आपल्या फॅन्ससाठी एक चाहत्यांसाठी रिल शेअर केलं आहे त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी मात्र तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे. त्यामुळे तिला यावेळी नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. तुम्ही म्हणाल की असं ट्रोल करण्यासारखं या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? परंतु यावेळी तिच्या या व्हिडीओला चांगलंच रोस्ट करण्यात आलं आहे? तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की काय घडलं आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नावं आहे सई लोकूर. सईनं अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिनं बिग बॉसमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच सिझनमध्ये ती दिसली होती. त्यामुळे तिची चांगलीच लोकप्रियता वाढली होती. त्यामुळे सोबत तिचे आईवडिलही याच क्षेत्रातले आहेत. सध्या तिच्या या रीलची चर्चा आहे. 


हेही वाचा - वाढदिवसानंतर संजय दत्त शिवभक्तीत तल्लीन; घरच्या घरी केली शंकराच्या पिंडीची पूजा


थायलंडच्या फुकेतमधून तिनं एक रिल शेअर केला आहे. ज्यात तिनं गुलाबी रंगाचा वनपीस घातला आहे आणि सोबतच तिनं समर आऊटफिटला शोभेल असा लुक कॅरी केला आहे. यावेळी तिनं म्युझिकल रिल तयार केलं आहे. तिनं 'जेलर' या चित्रपटातील 'कवाला' या गाण्यावर रील केलं आहे. तमन्ना भाटियाप्रमाणे तिनंही यावेळी तिच्यासारखीच हुकअप स्टेप केली आहे. परंतु या गाण्यावरील तिचा डान्स एकदम उत्तम झाला असला तरीसुद्धा मात्र काही ट्रोलर्सनी तिला ट्रोल केलं आहे. यावेळी तिला वजनावरून ट्रोल करण्यात आलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्सही केल्या आहेत. तुझे पाय सुजलेले दिसत आहेत, तूझं वजन वाढलं आहे म्हणून तिला ट्रोल करण्यात आलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका ट्रोलरनं लिहिलंय की, 'फिटनेस नावाची काही गोष्ट असते की नाही?' तर दुसऱ्या एका ट्रोलरनं लिहिलंय की, 'पायांना काय झालं आहे???' अजून एका ट्रोलरनं लिहिलंय की, 'पाय किती सुजले आहेत?' तर अशाच एका ट्रोलरनं लिहिलं आहे की, 'तू जाडी झालीयेस' तर एकानं लिहिलंय की, 'लै वजन वाढलं'. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.