मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून 'तांडव' (Tandav) वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या वेब सीरीजमध्ये राम, नारद आणि शंकराचा (Tandav Web Series Controversy)  अपमान केल्याचा आरोप केला आहे. या वेब सीरीजविरोधात अनेक ठिकाणी तक्रार नोंदविण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर सैफ मुंबईत स्पॉट (Saif Ali Khan Angry on Paparazy)  झाला. या व्हिडिओत सैफ अली खान कॅमेरामनवर भडकलेला दिसला. सैफने फोटोग्राफरला गेट बाहेर काढलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तांडव'वरून सुरू झालेल्या वादावरून सैफ अली खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच दरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सैफच्या घराबाहेरचा आहे. 



शुक्रवारी दुपारी सैफ आपल्या मुलासोबत तैमूरसोबत त्याच्या घराच्या बिल्डींगबाहेर स्पॉट झाला. व्हिडिओ सैफ तैमूरसोबत गाडीत उतरला आणि तो घरी जात होता. याच दरम्यान पापाराजीने सैफला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सैफ भडकला. सैफने पापाराजीला घराच्या गेटबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर सैफच्या गार्डने देखील त्यांना गेटबाहेर जायला सांगितलं आणि गेट बंद करण्याचा इशारा दिली. यानंतर पापाराजीने सैफची माफी मागितली.


'तांडव'वरून सुरू झालेल्या वादावर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण असणं आवश्यक असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारवरने यावर कायदा तयार करायला हवं असं देखील गृहमंत्री म्हणाले.