मुंबई : सैफ अली खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्याची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे. सैफचा अमृता सिंगसोबत घटस्फोट झाला तेव्हा त्यांच्या घटस्फोटाशी संबंधित अनेक बातम्यांनी त्यावेळी खूप चर्चेत होत्या. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा विवाह 1991 मध्ये झाला होता. त्यावेळी अमृता इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. दुसरीकडे, सैफ अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलं नव्हतं आणि त्याला कोणी ओळखतही नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकेच नाही तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्यावेळी सैफ अली खान 21 वर्षांचा होता. तर अमृता सिंह 33 वर्षांची होती. या लग्नाच्या काही वर्षांनी सैफ-अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले झाली.  


मात्र, सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्नानंतर काही वर्षांनीच त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या झळकू लागल्या. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा घटस्फोट झाला.


अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर करीना कपूरने सैफच्या आयुष्यात एंट्री घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'टशन' चित्रपटादरम्यान दोघांची जवळीक वाढू लागली होती, एवढंच नाही तर त्यांनी एकमेकांना डेटही केलं होतं. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, करिनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफ अली खानने त्याची पहिली पत्नी अमृता सिंगला एक पत्र लिहिलं होतं.


अमृताला हे पत्र पाठवण्यापूर्वी करिनानेही ते वाचलं होतं, असं म्हटलं जातं. या पत्रात सैफने लिहिलं आहे की, अमृता तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. तसेच, त्याच्यासोबत घालवलेल्या चांगल्या क्षणांचा उल्लेख करत, सैफने पुढे लिहीलं होतं की, तो करिनासोबत त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे.


हे पत्र वाचल्यानंतर अमृतावर खूप सकारात्मक परिणाम झाला आणि तिने स्वतःच्या हाताने तयारी करून आपली मुलगी सारा अली खानला सैफच्या लग्नासाठी पाठवलं. सैफच्या लग्नात साराने त्याचं अभिनंदन केलं आणि त्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या असंही म्हटलं जातं.