Aakash Thosar as Bal Shivaji: छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्वचं इतके उत्तुंग आहे की आजच्या काळातील साहित्यिकांना, इतिहासकारांना त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनाही त्यांच्याबद्दल विशेष कौतुक अन् कुतूहल आहे. लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनाही त्यांच्याबद्दल कुतूहल वाटल्याशिवाय राहिल नाही. त्यांनी मागील वर्षीच त्यांच्या 'बाल शिवाजी' या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु त्याहूनही 'बाल शिवाजी'च्या भुमिकेतून कोणता अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार याचीही प्रेक्षकांना तूफान उत्सुकता लागून राहिली होती. परंतु ही उत्सुकता आता संपली आहे कारण रवी जाधव यांनी आपल्या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्टाग्रामवरून रवी जाधव यांनी 'बाल शिवाजी'च्या भुमिकेतील अभिनेत्याचा चेहरा रिवील केला आहे. सगळ्यांनाच हे जाणून घ्यायची उत्सुकता होती की या भुमिकेसाठी नक्की कोण अभिनेता रूपेरी पडद्यावर येणार, परंतु खुद्द रवी जाघव यांनीच त्याबद्दल खुलासा केला आहे. 'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोकर 'बाल शिवाजी'च्या भुमिकेतून दिसणार आहे. त्याचा लुक समोर आला असून या लुकमध्ये तो उठून दिसतो आहे. या पोस्टखाली चाहते सकारामत्मक कमेंट्स करताना दिसत आहेत.अनेकांना आकाशचा हा लुक प्रचंड आवडला आहे. 


हेही वाचा - नशिब पालटलं! ज्या शोमधून दाखवला बाहेरचा रस्ता, तिथंच आज 'ही' लोकप्रिय गायिका आहे Judge


रवी जाधव यांच्या सिनेमांचे सगळेच फॅन्स आहेत. त्यांचे तीन चित्रपट आता पाईपलाईनमध्ये आहेत. त्यांचा अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनित 'ताली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक बायोपिक असून गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचाही फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आला आहे. सर्वांनाच या चित्रपटाचीही उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचसोबत त्यांचा भव्यदिव्य चित्रपट 'अटल' हा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. या चित्रपटातून भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भुमिका अभिनेते पंकज त्रिपाठी करणार आहेत. आता त्यांनी आपल्या 'बाल शिवाजी' या चित्रपटाचाही लुक सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. सध्या 'बाल शिवाजी'च्या भुमिकेतील आकाश ठोकरचा लुक सर्वत्र व्हायरल होतो आहे. 



"लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो” महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर, असं कॅप्शन टाकतं दिग्दर्शक रवी जाधव यांनी आकाशचा लुक रिवील केला आहे. सध्या त्याच्या या लुकची सर्वत्रच चर्चा रंगली आहे.