मुंबई : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर कमालीची चर्चेत असते.. आर्चीने आपल्या दमदार अभिनयाने तर प्रेक्षकांना वेड लावलं आहेच, पण तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट देखील सगळ्यांचच लक्षवेधून घेणाऱ्या असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्चीला साड्यांची विशेष आवड आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर नजर मारली, तर तिचं साडी प्रेम तुम्हाला ही दिसून येईल. त्यात आता आर्चीने नुकताच लाल रंगाच्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.



 


आर्चीने या फोटोत अगदी नवराई लूक केला आहे. अनेकदा रिंकू जेव्हा पारंपारिक अंदाजातील  फोटो शेअर करते तेव्हा चाहते तिला लगीनघाईबाबत आवर्जून प्रश्न विचारताना दिसतात. 



प्रेमाच्या लाल रंगात आर्चीला पाहून अनेकांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे. तिचं हे नवं फोटोशूट सध्या कमालीचं व्हायरल होत आहे.