मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लिला भन्साळी या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधान आले होते. आता या चर्चांना पूर्णविराम लागणार आहे. सलमान आणि भन्साळी 'इनशाल्लाह' सिनेमाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत आणि विशेष म्हणजे सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट सुद्धा झळकणार आहे. या सिनेमाच्या मध्यमातून सलमान - आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. तब्बल २० वर्षांनंतर सलमान आणि भन्साळी एकत्र काम करणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात मुख्य भूमिकेत सलमान - आलिया चाहत्यांच्या समोर येणार आहे. सिनेमाची कथा एका प्रेमकथेवर बेतलेली आहे. खुद्द सलमानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन संजय यांच्या सोबत २० वर्षांनंतर काम करण्यास खूप आनंदी असल्याचे त्याने सांगितले. 




त्याचबरोबर आलिया भट्टने सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून सिनेमात काम करणार असल्याची अधिकृत घोषणा केली. आलिया म्हणते, 'स्वप्न नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहायला हवेत आणि ते नक्कीच पूर्ण होतात. मी जेव्हा नऊ वर्षांची होती, तेव्हा मी पहील्यांदाच दिग्दर्शक संजय लिला भन्साली यांच्या कार्यालयात पाय ठेवला होता आणि त्यांच्या पुढील सिनेमात मला काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आणि प्रार्थना मी केली होती.'


सांगण्यात येत आहे की, सिनेमात मुख्य भूमिकेसाठी प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोन, कतरिना कैफ यांच्या नावाची देखील चर्चा रंगली होती. पण सिनेमात अखेर आलिया भट्टची वर्णी लागली आहे. 'इनशाल्लाह' सिनेमा २०२० मध्ये सिनेमागृहात दाखल होणार आहे.