काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानला तुरूंगवास झाल्यास आसाराम बापूंचा होऊ शकतो शेजारी
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर अन्य कलाकारांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी सलमान खानला किती शिक्षा होणार ? याबाबत थोड्याच वेळात माहिती दिली जाईल. काळवीट शिकार - काय आहे हे प्रकरण ?
किती वर्षांची शिक्षा होण्याचा अंदाज ?
ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडचे 500 कोटी अवलंबून
आसाराम बापूंसोबत राहणार?
सलमान खानला शिक्षा झाल्यास त्याची रवानगी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये होऊ शकते. येथेच आसाराम बापूदेखील आहेत. त्यांच्या बाजूच्या बॅरॅकमध्ये सलमान खानला ठेवण्याची शक्यता आहे.
कैदी नंबर 343
मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा त्याला बरॅक नंबर 1 मध्ये ठेवण्यात आले. तेथे सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक 343 होता.