काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडचे 500 कोटी अवलंबून

काळवीट शिकार प्रकरणी सलामान खानसह अन्य सात कलाकारांवर आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी सलमान खान प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

Updated: Apr 5, 2018, 11:00 AM IST
काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडचे 500 कोटी अवलंबून  title=

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलामान खानसह अन्य सात कलाकारांवर आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी सलमान खान प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

सलमान खानला आज शिक्षा झाल्यास, तुरूंगवास झाल्यास बॉलिवूडला मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्टवर सुमारे 500 कोटीचा फटका बसणार आहे. काळवीट शिकार - काय आहे हे प्रकरण ?

सलमान खानचे आगामी चित्रपट  

रेस 3 

नुकतच सलमान खान 'रेस3' या चित्रपटाचे अबुधाबीमधील शेड्यूल संपवून आला आहे. हा चित्रपट यंदा ईदला म्हणजे 15 जूनला रीलिज होणार आहे.  
रेमो डिसुझा दिगदर्शित हा चित्रपट 100 कोटी बजेटचा आहे. 

 भारत  

अली अब्बास जफरसोबत 'भारत' हा चित्रपट सलमान करणार आहे. 'सुल्तान' , 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर अली आणि सलमान 'भारत' या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. 'ऑड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. 'रेस 3' नंतर सलमान भारत च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. 

दबंग 3 

सलमान खानच्या मागील दबंग चित्रपटाच्या दोन्ही यशस्वी कामगिरीनंतर सलमान खान दबंग 3 हा सिनेमा करणार आहे. हा सलमान  खानच्या होम प्रोडक्शनमधील एक  चित्रपट आहे. 

दस का दम 

दस का दम  हा टेलिव्हिजन शो लवकरच पुन्हा सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. या शोचं अ‍ॅकरिंग सलमान खान करणार आहे. दस का दमचे प्रोमो टेलिव्हिजनवर सुरू करण्यात आले आहेत. 

बिग बॉस 12 

सलमान खानने बीग बॉसचे  8 सीझन सलग होस्ट केले आहेत. बिग बॉस 12 चंही आयोजन केलं जाईल. एका सीझनसाठी सलमान खान 11 करोड रूपयांचं मानाधन घेतो.