`असे लोक...`, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडकडून सोनू निगमवर अत्याचार आणि फसवणूकीचे आरोप!
Somy Ali Accused Sonu Nigam : सोमी अलीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या खुलासा केला आहे.
Somy Ali Accused Sonu Nigam : बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अली खाननं गायक सोनू निगमवर फसवणूकीचा आरोप केला आहे. सोमीनं एक व्हिडीओ शेअर करत सोनू निगम संबंधीत एका घटनेचा उल्लेख केला. मात्र, यावेळी सोमी अलीनं सोनूचं नाव घेतलेलं नाही. पण तिच्या कॅप्शनमध्ये सोनूचा उल्लेख आहे आणि इतकंच नाही तर त्याला टॅग देखील केलं आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसते की 3 वर्षांपूर्वी आणि नुकताच त्याचा वापर करण्यात आला आहे. तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिचा फायदा उचलण्यात आला. त्यानंतर तिची फसवणूक झाल्याचे तिला वाटू लागले.
सोमी अलीनं सांगितलं की 'काही वर्षांपूर्वी तिनं एका टॉक शोची सुरुवात केली होती. ज्यात ती काही लोकांची मुलाखत घेत होते. त्यापैकी एक व्यक्ती (कथितपणे सोनू निगम)नं बौधिक्तेनं चर्चा केली. त्या व्यक्तीनं खूप चांगल्या गोष्टींवर चर्चा केली. ती त्या व्यक्तीनं केलेल्या वक्तव्यांनी इम्प्रेस झाली आणि त्यासोबत तिला आश्चर्य झाले होते की अशी कोणी व्यक्ती असू शकते, जी आपल्याला ज्ञान देत आहे आणि त्या सगळ्यावर विश्वास ठेवतो. '
सोमी अलीनं सांगितलं की 'जेव्हा मी लंडनमध्ये कोणता प्रोजेक्ट मिळावा यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याची प्रयत्न करत होती. तेव्हा त्यांनी माझ्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं. मी त्या व्यक्तीचा खूप आदर करते.' सोमीनं पुढे देखील हे सांगितलं की 'सोनू तिच्या चॅट शोला यासाठी गेला कारण ती मुंबईमध्ये कोणाशी तरी जोडलेली होती आणि गायकाला दुसऱ्या व्यक्तीला हे सिद्ध करून दाखवायचं होतं की मी तुझ्या एक्स-गर्लफ्रेंडच्या शोमध्ये गेलो होतो.'
सोमी अलीनं सांगितलं की 'सोनू निगमसारखे लोक समाज विरोधी आहेत. सोमीनं व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिलं की लोकं अशीच असतात आणि ते तुमचा फायदा उचलतात. सोनू निगम (ती व्यक्ती) त्या लोकांचे व्हिडीओ बनवतो, ज्यांनी त्यांना खूप वाईट वागणूक दिली आहे. मला आश्चर्य झालं आणि हे तर कमीच सांगते. माझ्या मनात अशा लोकांसाठी खूप सन्मान होता. कोणत्याही व्यक्तीला ते बाहेरून कसे दिसतात, त्यावरून ती व्यक्ती कशी असेल हे ठरवू नका.'
हेही वाचा : 'त्याला कमी मानधन द्यायचंय'; करण जोहरच्या त्या वक्तव्याची सैफ अली खाननं उडवली खिल्ली!
सोमी अलीनं पुढे लिहिलं की 'माझ्यावर विश्वास ठेवा की माझी फसवणूक करण्यात आलेली आहे आणि हे विश्वास ठेवता न येण्या जोगं आहे. मला अजून विश्वास होत नाही. तर तशी ती व्यक्ती सोनू निगम आहे, ज्यानं माझी फसवणूक केली. सावधान राहा. त्याला व्हिडीओ शूट करायला फार आवडतं. त्यानं माझा वापर केला आणि अत्याचार केला. अशा प्रकारचे लोक समाज विरोधी (सोशियोपॅथ) असतात. मला अजूनही त्यांची गाणी आवडतात. फक्त मला ही आशा नव्हती की तो इतक्या खालच्या तळाला जातील.'